भामटीत तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन
दिना़क 14 फेब्रुरीपासून तर सोमवार दिनांक 16 फरवरी पर्यंत आयोजन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि ११) :श्री संत शंकर महाराज आश्रम नागपूर भोगे ले आऊट भामटी नागपूर येथे शनिवार दिनांक 14 फरवरीपासून तर सोमवार दिनांक 16 फरवरी पर्यंत तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भोगे ले आऊट भामटी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परमहंस समर्थ सद्गुरू श्री संत शंकर महाराज यांच्या पावन उपस्थितीत महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन केले असून सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे समाजसेवक संजय सातपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे. शनिवारी तीर्थ स्थापना, रविवारी रुद्र अभिषेक, आणि सोमवारी हभप श्री बाळासाहेब वाल्हेकर पुणे, गोपाल काल्यानंतर कीर्तन त्यानंतर आरती व भव्य महाप्रसादाचे वितरण केले जाईल.



