0
4
8
2
9
0
तणावात मी
उंच डोंगर समस्यांचे
धारा जणू नद्यांच्या…
सावरणार मात्र तूच
तणावात मी म्हणताना
बघ डोंगरावरून खाली
दऱ्याखोरी निश्चल किती
उंचावरून वाही धबधबा
कोसळण्याचे तयाला….
न वाटे सुखदुःख काही
तसाच राहा तू या जगी
कोसळला दुःखाने कधी
नदी समजून वाहत राहा
जीवन काठावरचे सदैव
हसण्याने फुलवत जा…
तणावात मी म्हणतानाही
सूर आनंदाचे गात राहा…
वैशाली अंड्रस्कर
जि.चंद्रपूर
=========
0
4
8
2
9
0



