0
4
8
2
9
7
उकीरडा
घर अंगणीचा सारा
शेण पोयटा सावळून
भरूण वडग्यामध्ये माय
देते उकिरड्यावर फेकून ।।
उकीरड्याचे पाहून रूप
हात नाकाला लागतो…
भोपळ्याचे पिवळे फूलं
अंगाखांद्यावर खेळवतो…।।
ज्यानी सुटे घान दर्प
तोच मळा फुलवतो
रस कस ओतून सारा
पिकं डौलाने मिरवतो…।।
मनाचा कचराही
उकिरड्यावर फेकून द्यावा
सद्गुणांच्या स्वच्छतेने
जीवन मळा फुलवावा..।।
कंचना मंडपे नागपूर
0
4
8
2
9
7



