Breaking
अहमदनगरकविताखानदेशगडचिरोलीचंद्रपूरनागपूरनांदेडनाशिकपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 8 2 9 0

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*

*☄विषय : सत्वपरीक्षा☄*
*????शनिवार : २८/ ०९ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*सत्वपरीक्षा*

किती केले उपासतापास
अन् किती ती केली व्रतं
तरी का रे माझ्याच देवा
पाठी ही लागलीत भूतं..

दैव देतं,कर्म नेतं
सारं काही लुटून
पाहत बसतो हतबलतेने
धीर जातो सुटून..

शरीर जगवतो कसेबसे ते
जमवुन काडी..पसा
भरमसाठ त्या महागाईने
रिकामाच राही खिसा..

बॅंकेत आले हजार काही
मी झाले देवा लाडकी
कृपा वाटली झाली आता
तोच सिलिंडर भरवी धडकी..

प्रवास मिळाला फुकट सवलतीत
घेतल्या की गाठीभेटी
खाण्या,घेण्यावर लागला तोवर
भरारा तो जी.एस टी ..

असु दे देवा साथ धन्याची
धडधाकट कष्टासाठी
नकोच आशा, सत्वपरीक्षा नको ही
बळ दे जगण्यासाठी..

*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*

असे आले जीवनी प्रसंग
थरथरून गेले सारे अंग
सत्वपरीक्षा तर नाही ही माझी
विचार करण्यात मन झाले गुंग

का मी सारे सोसायचे
याचीच मना वाटे खंत
का मी सतत भोगायचे
दुःखाचा होऊ दे ना अंत

क्षणोक्षणी सत्वपरीक्षा
जणू माझी अग्निपरीक्षा
एवढ पण छळू नको देवा
रुंदावू दे प्रगतीच्या कक्षा

फुलू दे जीवनी माझ्या
सौख्याचा अन आनंदाचा सडा
कधी न लागो दृष्ट कधी
सुखाला न लागो तडा

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*

तुझ्या माझ्या संसाराचा
छोटंसं एक विश्व होते
हातात हात घेऊन
स्वप्न ते रंगवत होतं

स्वप्न नवे ते साकारताना
तू दिवा आणि मी पणती होती
सुख आणि दुखातही
एकमेकांच्या सावलीप्रमाणे उभं होतं

छोट्याशा या विश्वात
दोन कळ्या फुलले होते
प्रेम, ममता, वासत्याने
ते सजवलं होतं

अचानक एक वादळ आलं
आणि सर्वकाही घेऊन गेल होते
यात दोष काय माझा
पांढ-या पायाची बोलू लागलं होतं

तुम्ही गेल्यापासून एका मागून एक
संकटाची मालिकाच सुरू झाली होती
तुमच्यामागे जबाबदारी सांभाळणे
ती एक प्रकारची माझी सत्व परिक्षाच होती

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*

कधी संपेल सत्वपरीक्षा
आता तूच सांग रे देवा
दुःख सोसून सुखी मी
विनाकारण माझा हेवा…!!

संकटाशी दोन हात मी
आयुष्यात करत राहिले
पैशापेक्षा व्यक्ती महत्वाची
आर्थिक हानीला साहिले…!!

डोंगराएवढे दुःख पदरी
काळीज वेदनेने फाटले
अश्रूधारांनी वेळी अवेळी
नयनाला सारखे गाठले…!!

संघर्ष,दुःख चक्रीवादळात
शरीर सारे पोखरून गेले
चिंता क्लेश भय नित्याचे
स्वतःने स्वतःला सावरले…!!

बस झाली सत्वपरीक्षा देवा
मनाला चिरशांती लाभू दे
उर्वरित आयुष्यात आतातरी
सत्कार्यास शक्ती लाभू दे …!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*सत्वपरीक्षा*

कस सोन्याचा लागतो
लोखंडाचा मात्र नाही ,
पारख मौल्यवानची होते
साधारणची तेवढी नाही…

विजय सत्याचाच होतो
असत्याचा होत नाही,
सत्वपरीक्षा होते गुणाची
अवगुणाची होत नाही….

तावूनसुलाखून अग्नितून
निघाल्याशिवाय कळेना,
खऱ्याची कसोटी पणाला
लागल्याशिवाय समजेना…

ही तर शोकांतिका खरी
वर्षानुवर्ष चालत आली,
कठीणकाळ परिस्थितीत
सत्वपरीक्षा होत राहीली…

खऱ्याचीचं माय वनवासा
यातना भोगून परत आली,
तो पर्यंत तर लबाडाने इथं
भरपूर मौजमजा ही केली…

पुरुषप्रधान संस्कृतीत ही
सत्वपरीक्षा स्त्रीची झाली,
निष्कलंक पवित्र सीतेला
अग्निपरीक्षा द्यावी लागली…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*

सत्वपरीक्षा मांडलेली सदाच
उघडून दाभाडे स्त्रित्वाची
एकटीच स्त्री कशी जिम्मेदार
का नसे परीक्षा पुरूषत्वाची

जरा पाहता इकडे तिकडे
पोटशूळ समाज मनी
हास्य कुठे फुलता
कळ निघते ह्रदयातूनी

दोष कोणाचा अंध माणसा
का नाही घेत तपासाया
गुन्हा तिचाच सिद्ध करून
सिद्ध तू शिक्षा द्यावया

पाऊल चूकले का तिचे
बुद्धी हिन तू समजावया
अन्याय करण्या तू तत्पर
वय न पाहता पिडीतो तनया

विद्रोह उठतो मनात माझ्या
शब्द अधूरे मज समजावया
दोषी का तीच नेहमी
चल जाऊ सोबत शोधावया

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक/परिक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*

तत्ववादी, सत्यवादीच
देतात घोर सत्वपरीक्षा
प्राणांतिक साधनेअंती
साधतात ते सत्य रक्षा.. //

होवून गेला अयोध्येचा
सत्वशील राजा हरिश्चंद्र
स्वप्नात राज्य दिले दान
घेण्यास आले विश्वामित्र…//

पद प्रतिष्ठा राज वैभव
क्षणात सारे त्याग केले
राजसिंहासन राजवस्त्र
विश्वामित्रास दान दिले.. //

ना भूतो ना भविष्यती
ऐसा सत्वशील राजा
जिंकले विश्वामित्र मुनी
त्रिभूवनात गाजावाजा.. //

ही नव्हे फक्त दंतकथा
आदर्श चारित्र्य गाथा
सत्य, सत्व, स्वत्वापुढे
नम्रतेने झुकावा माथा.. //

आज घोर कलियुगात
शब्द वचन तृणासमान
सत्वपरीक्षा सत्याचीच
असत्यास मान सन्मान.. //

मात्र सत्यच अजिंक्य
सदा सर्वकाळ विजेते
येवोत लाख विघ्ने तरी
अंतीम सत्यमेव जयते…//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्व परीक्षा*

साळसूदांच्या या जगात
गंगाच उलटी वाहते
असत्याची चलती येथे
सत्य मूग गिळून बसते

सत्यालाच पदोपदी इथे
अग्नीपरीक्षा द्यावी लागते
सीतेसारख्या पतिव्रतेची
सत्व परीक्षा घेतली जाते

स्वार्थाच्या या बाजारात
मुखवटेच हो फिरतात
मुखवट्याआडचे चेहरे
कधी कोणाला दिसतात

सत्तेपुढे न चाले शहाणपण
बळी दुबळ्यांचा कान पिळी
तापल्या तव्यावर भाजती पोळी
चोर सोडून संन्याशाला सुळी

बळीराजा शेतात राबतो
घाम गाळून शेत पिकवतो
जगाचा पोशिंदा अर्धपोटी
कोण तयाला न्याय देतो

शिक्षण श्रीमंतांची मक्तेदारी
गरीबांची का वाया हुशारी?
उपाशी राहतो कष्टकरी
खोट्यांची चाले इथे शिरजोरी

जातीयतेचे बीज विषारी
वृक्ष याचा बनला काटेरी
मतलबींची इथे मांदियाळी
धर्माचे राजकारण जहरी

माणुसकी आता लोपली
सावलीही परकी जाहली
नोटांभवती फिरु लागली
नाती तरी कुठे उरली?

सोने कसाला लावताना
तापून सत्व परीक्षा देते
उजळून लखलखीत होते
तसे खऱ्या चे मोल कळते

सत्वशीलांचा मार्ग खडतर?
हा प्रश्न सामान्यांसमोर
तरी सत्याचाच होईल विजय
खोटे कधीतरी येईल बाहेर

माणुसकीची जाण ठेवून
मार्ग सत्याचा तू स्वीकार
सातत्याने मनी भान ठेव
होणार सत्याचा जयजयकार

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे