Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

हरिणी गं तू..

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 3

हरिणी गं तू..

हरिणी गं तू बावरलेली
वणवा जीवन वनाला
अजाण पाडसे पोटाशी
चिंता जाळतेय मनाला.. //

लाट आली जीवघेणी
तुटलीय धन्याची गाठ
तटस्थ झाले जातभाई
फिरवली सर्वांनी पाठ.. //

हा कसा प्रारब्ध भोग
हे काय विपरीत घडले
तुला चहू बाजूंनी घेरले
पाऊल आगीत पडले.. //

नसे ठिपूस आधाराला
अंतरली अशी मायेला
वखवखलेल्या अग्नीत
कसे जपशील कायेला.. //

दुभंगलेल्या धरतीला
तुलाच हवे सावरायला
कोसळणार्‍या नभाला
तुलाच हवे आवरायला… //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे