0
4
8
2
9
3
मतलबी
ही दुनिया मायाबाजार
इथे तिथे मतलबी सारे
स्वार्थाच्या खुल्या बाजारपेठा
अहंकाराचे वाहती वारे ||१||
कामापुरता मामा
हीच जगाची रीत
आवळा देऊन कोहळा घेती
पाहती फक्त स्वहित |||२||
वशिल्याचे तट्टू सारे
प्रामाणिकाला नाही वाव
मतलबापोटी टपून बसले
ऑफीसातले हे साव ||३||
परके ते परकेच असतात
आपलेही मतलबी होतात
स्वार्थासाठी परस्परांत
क्लेश ओढवून घेतात ||४||
मतलबी या दुनियेचा
मतलब ओळखावा झणी
अशा अपप्रवृत्तींना कधीही
थारा न द्यावा जीवनी ||५||
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
3



