
0
5
4
1
0
2
जल्लोष
पेपर सरले
भर भर भर
मज्जा करुया
दिन दिवसभर…
लिंबूपाण्यात
साखर घोळू
पडवित बसून
चौकट खेळू…
रानात जाऊ
झोके घेऊ
कैऱ्या पाडून
मजेने खाऊ…
पक्ष्यांचा आवाज
किलबिल किलबिल
झाडाखाली देऊ
पायांना ढिल…
नितळ पाण्याच्या
नाल्यात पोहू
रानातील गमती
डोळ्यात साठवू…
गंम्मत जंमत
नकलांचा वेश
उन्हाळ्याची सुट्टी
करुया जल्लोष…
आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
========
0
5
4
1
0
2

