न्यु मून स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन
तारका रूखमोडे, गोंदिया
न्यु मून स्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन
क्रीडा सत्रास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पाच दिवशीय क्रीड़ा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष
तारका रूखमोडे, गोंदिया
जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
गोंदिया: न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज अर्जुनी /मोर येथे पाच दिवशीय क्रीड़ा महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 31 डिसेम्बर 24 व 1जानेवारी 25 रोजी क्रीड़ा महोत्सवाचे शानदार उद्घाटन शाळा समिती संचालक संतोष बुकावन यांचे अध्यक्षतेखाली समिती अध्यक्ष यशवंत परशुरामकर यांचे हस्ते समिती सचिव ओमप्रकाशसिंह पंवार,संचालक राधेश्याम भेंडारकर,शामराव सडमाके प्राचार्य राकेश उंदिरवाड़े यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी ‘विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासून सर्वांगीण विकास साधावा असे मत संस्थाध्यक्ष यशवंत परशुरामकर यांनी केले.तसेच विविध खेळांमध्ये सहभागी व्हावे,खेळाने तन मन दोन्ही सुदृढ़ होतात, नैपुन्य प्राप्त खेळाडूना राष्ट्रीय व राज्य स्तरीय खेळात सहभागी होण्याची संधीची सुरुवात विद्यार्थी जीवनापासून होते असे मत संतोष बुकावन यांनी यावेळी व्यक्त केले. सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी उचित मार्गदर्शन करुन उत्साह वाढवला.
नर्सरी ते बारावी पर्यंन्त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले. त्यात व्हॉलीबॉल, कबड्डी,रस्सीखेच,डॉसबॉल, १०० व २०० मिटर रनिंग,भालाफेक, गोळाफेक,लगोरी,बुद्धिबळ,संगीतखुर्ची आदी मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या.
विविध क्रीड़ा उपक्रमात सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली,सर्व विजयी खेळाडूंना सुवर्ण,रजत पदक व ट्रॉफी देवून गुणगौरव शाळा समितीचे सचिव ओमप्रकाश सिंह पंवार,सुरेन्द्रकुमार ठवरे,श्रीधर हटवार, राधेश्याम भेंडारकर,प्रा.उंदिरवाडे, प्रा. तारका रुखमोडे यांचे हस्ते करण्यात आले.अशाप्रकारे क्रीडासत्र सोहळा संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक 2 व 3 जानेवारी2025 रोजी विविध बौद्धिक उपक्रमांचे व विविध प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 4 जानेवारी रोजी स्नेहसम्मेलन उदघाटन इंजी.राजकुमार बड़ोले,आमदार अर्जुनी/मोर.विधानसभाक्षेत्र व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये इ. मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे, यास्तव सर्व पालक वृंदाना उपस्थित राहून आपल्या पाल्याचा उत्साह वर्धित करण्याचे आवाहन शाळा समितीच्या वतीने करण्यात आलेआहे.
सदर स्नेहसम्मेलन आयोजनार्थ शाळेचे प्राचार्य राकेश उंदिरवाड़े, पर्यवेक्षिका तारका रुखमोड़े,सूरज मोटघरे,प्रवीण नागपुरे,किशोर दीघोरे,विकास मेश्राम निकिता बंसोड़,चंद्रशेखर लांडगे,प्राथमिक पर्यवेक्षिका त्रिवेणी थेर,हिना लांजेवार, प्रतीक्षा राउत, प्रतीक्षा डोंगरवार, छबू बागड़े, शिला बोरीकर, सागर जांभूलकर, पायल बोरकर,राखडे,चंदा शिवनकर,दिनेश बागड़े, ज्ञानेश्वर परिहार, विना लांजेवार,दीपाली मसराम व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी परिश्रम घेत आहेत.