आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
तुझा खळखळ हसरा चेहरा
कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0
5
2
4
6
5
तुझा खळखळ हसरा चेहरा
एकांतात दिसतो मजला
तुझा खळखळ हसरा चेहरा
रममाण होतो तुझ्यात मी
दिसतो मजला मयूर पिसारा
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याची छबी
हृदयाच्या मंदिरात वास करते
गुलाबी गालावर उठते खळी
मन हर्षान भारावून जाते
छबी तुझी सुंदर प्रीतीची
चंद्रही लाजतो तुला पाहून
सुखात भरला जीवनाचा खेळ
नवी उमेद मिळे एका हसण्यानं
तुझा खळखळ हसरा चेहरा
मन आनंदात भरून जाते
उजळले मम मंगल जीवन
आठवणीत प्रेमाची गोळी खाते
जगण्यास सुंदर सूर सापडे
नवीन स्वप्न आशा फुलली
गाणी नव्याने छेडताना
जीवन आनंदानं बहरत आली
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
5
2
4
6
5



