
0
4
0
9
0
3
जिंकायचं तुलां?
जिंकायचं तुला ?
धर मनी इच्छा
पुरव तिचा पिच्छा
जिंकायचं तुला ?
पाहा असे स्वप्न जे
होणार नाही भग्न
जिंकायचं तुला ?
दे स्वप्नांना दिशा
न करता कोणतीही नशा
जिंकायचं तुला ?
ठेव सकारात्मक दृष्टीकोन
मग तुला अडवतो कोण ?
जिंकायचं तुला ?
असू दे समर्पण भावना
आकार येईल तुझ्या स्वप्नांना
जिंकायचं तुला?
जाणून घे वेळेचं महत्त्व
त्याशिवाय खुलणार नाही व्यक्तिमत्त्व
जिंकायचं तुला?
कामात असू दे शिस्त
यशाची हीच खरी भिस्त
जिंकायचं तुला ?
कर मनाचा निर्धार
झेपावशील साता समुद्रापार,
भुमेश्वरी सातपुते खोंडे
उमरेड जि.नागपूर
=======
0
4
0
9
0
3





