ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
बंधुप्रेम
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
0
बंधुप्रेम
दृष्ट कोणाची लागू नये
आपल्या या बंधुप्रेमाला
आपुलकी सदा बहरत राहो
मागणे हेच भगवंताला
भाऊ भाऊ आपण सारे
प्रेमान एकत्र राहू
वेदना एकमेकांच्या आपण
सारे मिळून साहू
नकोच कधी व्हायला
आपल्या वेगवेगळ्या वाटा
डोळ्यात पाणी एकाच्या जर
रूतला दुसर्याच्या पायी काटा
अहंकाराचा नकोच वारा
नको असूया मनी
आनंदाचा पारिजात सदा
फुलत राहो जीवनी
आदर्श बंधुप्रेम आपले
सार्या जगतास दावू
घेतला वसा सहजीवनाचा
तो तडीस आता नेऊ
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
4
8
2
9
0



