Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

रायगड जिल्हा परिषद व माजी जि. प. अध्यक्षांंची कारकीर्द

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

रायगड जिल्हा परिषद व माजी जि. प. अध्यक्षांंची कारकीर्द

लेखक – बळवंत वालेकर, ज्येष्ठ पत्रकार

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया नेटवर्क

भारताला १५ आॕगष्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तळागाळातल्या माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच खेडुतास सत्तेची खुर्ची मिळण्यासाठी २६ जानेवारी १९५० रोजी भारत *प्रजासत्ताक* देश झाला. पण देश प्रजासत्ताक होऊन १२ वर्षे लोटली तरी खेडुत माणूस सत्तेच्या खुर्चीपासून *कोसो मैल* दूर होता . म्हणून तळागाळातील *खेडुतास* सत्तेची खुर्ची मिळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून *जिल्हा परिषद* अस्तित्वात आली. येथे शहरी माणसास *”नो एंट्री”* असते. जिल्हा लोकलबोर्ड चा कारभार गुंडाळून १९६२ साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदा स्थापन झाल्या . जिल्हा परिषदेमुळे खेडुत माणसे , महिला व दलितांना सत्तेची गोड फळे चाखता यैत आहेत .
आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे सुरू आहेत . ९ वर्षांनी निवडणूक होत आसल्यामुळे खेडोपाडी निवडणुकीबाबत औत्सुक्य वाढलेले आहे . रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व १५ पःचायत समित्यांच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला आणि निकाल ७ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील .
जिल्हा परिषद स्थापनेच्या
काळात जिल्ह्यात *काॕग्रेस व शे. का. प, हे दोन बलशाली पक्ष होते .त्यांना सत्ता आलटून – पालटून मिळत असे. पहिल्याच निवडणुकीत तत्कालीन कुलाबा जिल्हा परिषदेत अखंडित कांग्रेस* पक्षाला बहुमत मिळाले आणि ज्येष्ठ वातंत्र्य सैनिक व गांधीनिष्ठ केशव गोविंद तथा *दादासाहेब लिमये* यांना कुलाबा जिल्हा परिषदेच्या *प्रथम* अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला .
. १९६२ ते २०२२ या कालावधीत अध्यक्ष पुढील प्रमाणे झाले . तसेच २०२२ ते २०२५ पर्यंत प्रशासकीय राजवट होती . नूतन जिल्हा परिषद अध्यक्षाँची निवड झाल्यानंतर प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल .
*माजी अध्यक्ष*
१) दादासाहेब लिमये (काॕग्रेस)
२) तुकाराम हरी वाजेकर (शे. का .प
३) हुसेन महंमद वांगारे (काॕग्रेस)
४) विठ्ठलराव देशमुख – ( काॕ) प्रभारी
५) तुकाराम ह, वाजेकर (शे. का, प.)
(६) प्रभाकर पाटील (शे. का, प)
(दि. ८/[६ /१९७९ ते दि. ३० /६ [१९९०- अखंडित ११वर्षे)
प्रशासकीय राजवट दि. १ /७ /९० ते दि. २० /३ / १९९२)
८) सुनिल तटकरे (काॕ.) – ९२ ते ९५
९).प्रकाश धुमाळ (काॕ) प्रभारी)
१०) अनंत पाटील (काॕ. ) दि. २२/६/९५ ते २२ – १ -९६ पर्यंत
११) प्रशासक राजवट दि. ३१-१ -९६
ते दि, २२ – १ -१९९६ पर्यत
१२) रमेश डाऊर (काॕ.)
१३) विठ्ठल लोहकरे ( काॕ, )
१४) अब्दुल सत्तार अंतुले (काॕ.
१५) सौ. सुप्रिया पाटील(शे. का .प.)
१६) सौ. अपेक्षा कारेकर (शिवसेना)
१७) बाळाराम पाटील ( शे. का. प. )
१८)सौ. निलीमा पाटील (शे. का. प
१९) प़डितशेट पाटील (शे. का. प.)
२०) सौ. कविता जगदीश गायकवाड
(शे. का. प.)
२१) सुरैश टोकरे (राष्ट्रवादी काॕ.)
२२) कु. आदिती तटकरे (राष्ट्रवादी काॕ
२३) आस्वाद पाटील (शे. का. प.)
२४) योगिता पारधी (दि. २०-३-२२प
दि. २१-३-२२ पासून प्रशासक
*कार्यसम्राट अध्यक्ष*
१) *दादासाहेब लिमये* – दि . १ मे १९६२ च्या *महाराष्ट्र दिना* पासून जिल्हा परिषदेचा करभार सुरू झाला. दादासाहेब लिमये प्रथम अध्यक्ष तर कॕप्टन क्रुष्णराव देसाई
(I. A. S. ) प्रथम सी. ई. ओ. होते .
जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे असावे की पेणला , हा वाद अनेक वर्षे चालू होता . जिल्हा लोकल बोर्ड कार्यालय पेणला असल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालय पैण ला हवे ही पेणकरांची मागणी . होती . म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पहिल्याच सभेत *जिल्हा परिषदेचे कार्यालय पेण येथे असावे* असा , ठराव करण्यात आला. या ठरावाविरुद्ध अलिबागकरांनी *स्टे* आणला.
शेवटी *जेथे जिल्हाधिकारी कर्यालय तेथे जि. प. कार्यालय* असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला.या वादावादीत जिल्हा परिषदेचा कारभार हाकणे दादासाहेब लिमये यांना कठीण जात होते . शिवाय अपुरा व अननुभवी स्टाफ , अपुरा निधी , प्रबळ विरोधी पक्ष तसेच शिक्षण (प्राथमिक व माध्यमिक विभाग) ,वेतन पथक , ग्राम पःचायत , आॕडिटर , इ. महत्त्वाची जिल्हा परिषदेची खाती सुरूवातीपासून पेण येथे होती . त्यामुळे कारभारात सुसूत्रता नव्हती . अशा प्रतिकूल परिस्थितीत नूतन अध्यक्षांनी कारभारास सुरुवात केली. सर्व क्लुप्त्या वापरल्या. प्रथम तः दादासाहेबांनी अधिकारी वर्गास विश्वासात घेतले . “बाते कम और काम जादा ” हे धोरण अवलंबिले. महात्मा गांधीजींच्या विचारसरणीचा वापर करून कमीत कमी खर्च , करण्याचे आदेश खाते प्रमुखास दिले . गावोगावी जाऊन ग्रामस्थांना विश्वासात घेतले आणि श्रमदानाचे महत्त्व पटवून रस्ते व पाणी पुरवठ्याची कामे श्रमदानानै करवून घेतली , विविध योजना राबविणा-या गावांना प्रोत्साहन मिळण्यासाठी *ग्रामगौरव* समारंभ घडविले . आणि राज्यात वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा परिषद म्हणून नावलौकिक वाढविला. : तुटपुँजा निधी , कमी स्टाफ, अलिबाग – पेण वाद याववर मात केल्यामुळे कुलाबा जिल्हा परिषद ही वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा परिषषद राज्यात गणली गेली
*प्रभाकर पाटील* – डावी विचारसरणी , तिखट लेखणी , प्रभावी वक्त्रुत्व , अचूक निर्णय क्षमता, पराकोटीचे धैर्य , हजरजबाबीपणा आणि झुंझारव्रुत्ती ही ‘ वैशिष्ट्ये होती . जनता पक्षाच्या सहकार्याने ते अध्यक्ष झाले. त्याकाळात काॕग्रेस पक्ष बलशाली होता . राज्यात व केंद्रात काॕग्रेसची सत्ता होती . तरीही प्रभाकर पाटील यांनी अनेक धाडशी निर्णय घेतले. “पेण येथे असलेली जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये अलिबाग येथे आणून ध्वजारोहण एका छताखाली करण्याची घोषणा केली ” आणि १९७९ सालच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी पेण येथे असलेली जि. प. ची सर्व कार्यालये अलिबागेत आणली व एका छताखाली स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यानंतर जि. प. ची सर्व खाती एकाच प्रशासकीय इमारतीत आणण्यासाठी *शिवतीर्थ* हे “मिनी मंत्रालय अलिबागेत बाँधले. त्याकाळात राज्यात रायगड जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद शे. का. प. कडे ( विरोधी पक्षाकडे ) होती तरीही प्रभाकर पाटील यांनी अनेक धाडशी निर्णय घेतले .विकासाची बहुसंख्य कामे केली पण डावी विचारसरणी सोडली नाही . निसटते बहुमत असल्यामुळे अकरा वर्षांच्या कारकीर्दीत अनेक वेळा काॕग्रेस पक्षाकडून अविश्वास ठराव दाखल झाले. पण प्रत्येक वेळी प्रभाकर पाटील *विन* ठरले , आणि महाराष्ट्रात धाडशी व प्रभावी जि. प. अध्यक्ष ठरले.
*खासदार सुनिल तटकरे*- स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकप्रतिनिधींची कार्यशाळा असते. या कार्यशाळेतूनच लोकप्रतिनिधी घडतात . याला अपवाद सुनिलजी तटकरे ठरले. कारण ग्राम पंचायत , पंचायत समिती अगर जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा अनुभव पाठीशी नसताना काॕग्रेस पक्षातर्फे तटकरे साहेब थेट जिल्हा परिषद अध्यक्ष निवडले गेले . परंतु विरोधी बाकावर बसलेले व “जिल्हा परिषद कायदा ” कोळून प्ययलेले तसेच ग्राम पंचायत सरपंचपद , प़चायत समिती सभापतीपद व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रदीर्घ अनुभव असले ले प्रभाकर पाटील विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले असताना जिल्हा परिषदेच्या सभेत तटकरे यांचा निभाव कसा लागणार , याची चिंता काॕग्रेस श्रेष्ठींना लागली होती . पण पिताश्री *दत्ताजीराव* *तटकरे* विद्यापीठाचे ते फर्स्ट क्लासचे विद्यार्थी होते .सूक्ष्म अभ्यास , जबरदस्त स्मरणशक्ती , भावनाशील वक्त्रुत्व त्यांना लाभले आहे . जिभेवर सरस्वती खेळते आहे सभाशास्त्राची जाण आणि हजरजबाबीपणाची साथ आहे . जिल्ह्याचा इतिहास व भूगो ल ज्ञात आहे . पत्रकार परिषदेत जि. प. अधिका-यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच देऊन सर्वांना तटकरे साहेब आश्चर्य चकित करीत असत. अधिकारी वर्गास इंग्रजी भाषेतून आदेश देत आसत. विरोधकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत . विविध क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीःं च्या सन्मा नासाठी *रायगड मित्र पुरस्कार सुरू केला. नंतरच्या पदाधिका-यांनी या पुरस्काराचे नामांतर रायगड भूषण* *पुरस्कार* केले.परंतु गुणवत्ता न तपासता शेकड्यांच्या संख्येत हे पुरस्कार वाटले गेल्यामुळे पुरस्काराचे महत्त्व कमी झाले. आसो त्यांना राज्याच्या राजकारणात प्रवेश करावयाचा असल्यामुळे त्यांनी पाच वर्षे मुदतीचे अध्यक्षपद २ वर्षे ११महिने , २५ दिवसच भूषविले. विरोधकांनाही अचूक उत्तरे देऊन जि. प. अध्यक्षपदाची उँची वाढविली परंतु अर्धवट अध्यक्षपद सोडल्यामुळे जिल्हा काॕग्रेसला ओहोटी लागली हे निश्चित .
*ना. आदितीताई तटकरे* – महिला व बालविकास खात्याच्या विद्यमान मंत्री ना. आदितीताई तटकरे सन २०१७ ते २०१९च्या कालावधीत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. तत्पूर्वी त्या ग्राम पँचायत ते जिल्हा परिषदेपर्यंत कोठेही सामान्य सदस्याही नव्हत्या .पण त्या *सुनिल तटकरे* यांच्या तालमीत प्रशिक्षित झाल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या सक्षम अध्यक्षा ठरल्या , जि. प. च्या सर्व खात्यांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवू शकल्या. राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी योग्य तो निधी आणला. पर्यायाने राष्ट्रवादी काॕग्रेसची शक्ती वाढविली तसेच श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास केला. म्हणूनच त्या २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी तर्फे श्रीवर्धनमधून प्रचंड बहुमताने निवडून आल्या.व कार्यक्षमतेमुळै त्या महिला व बालकल्याण खात्याच्या कॕबिनेट मंत्री झाल्या . विद्यमान मंत्रीमंडळातील अनेक मंंत्र्यांवर भ्रष्टाचारासह अनेक आरोप होत आहेत .वाचाळपणामुळे मुख्यमंत्री अनेक मंत्र्यांना *समज* देता त .पण आदितीताई त्यापासून “कोसो” मैल दूर आहेत . मंत्री म्हणून चांगली कामगिरी असून रायगड जि. प. अध्यक्षपद त्यांना पूरक ठरत आहे . जि.प च्या सर्व माजी अध्यक्षांच्या कार्य कोशल्यामुळे जिल्ह्याची घोडदोड सुरू आहे . रायगड आगे बढो ! पण आता सर्वांचे लक्ष २०२६ ची तब्बल ९ वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद भूषविणारा भाग्यवान अध्यक्ष कोण , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे