Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

25 वर्षानंतर वाचनसंस्कृती संबंधी दूरदृष्टी आवश्यक : डाॅ.मधुसूदन घाणेकर

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 3

25 वर्षानंतर वाचनसंस्कृती संबंधी दूरदृष्टी आवश्यक : डाॅ.मधुसूदन घाणेकर

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे (दि ५ डिसे.): तितिक्षा इंटरनॅशनल आयोजित, आंतरराष्ट्रीय समाज माध्यम जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी संपादित केलेल्या विश्वविक्रमी 990 व्या डहाळी अनियतकालिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन, तसेच पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित ‘एम अजया’ ह्या 261 व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षण महर्षी डाॅ.न.म.जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा आणि रंगकर्मी प्रिया दामले , रजनी भट, सतीश इंदापूरकर तसेच विश्वसुंदरी डाॅ.प्रचिती पुंडे आणि आंतरराष्ट्रीय बालकवयित्री एम अजया आदि मान्यवर उपस्थित होते.

सुप्रसिध्द कवयित्री सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ.न.म.जोशी यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आगामी 25 वर्षानंतरच्या काळात उदयास येणा-या साहित्यिकांच्या शाश्वत लेखन निर्मितीची दूरदृष्टीतून वाचन संस्कृतीचा प्रसार अधिक गतिमान व्हावा असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे साहित्यिक, संपादक, विचारवंत,कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आपल्या प्रमुख भाषणात केले.

एम अजया या पुस्तकाची निर्मिती एम प्रकाशन तर्फे करण्यात आली. सदर पुस्तक डाॅ.घाणेकर यांनी बाल कवयित्री एम अजया हीच्या काव्य लेखनातील प्रगल्भतेवर लिहिले आहे. या पुस्तकात डाॅ.घाणेकर यांनी अजयावर कविता लिहिली आहे. तिचे व्यंगचित्र रेखाटले आहे. अजयाची सही, कुंडली तसेच भाग्यांक यावरही शास्त्रीय दृष्टिकोनातून समर्पक असे भाष्य केले आहे. मुखपृष्ठही डाॅ.घाणेकर यांचे असून संपूर्ण पुस्तकच डाॅ.घाणेकर यांच्या अक्षररेखटनाने अवघ्या 25 पानात आकर्षक पध्दतीने नटवून एक प्रकारे हा सबकुछ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा हा अनोखा विश्वविक्रमच म्हणावा लागेल असे प्रतिपादन तितिक्षा इंटरनॅशनलच्या सर्वेसर्वा प्रिया प्रमोद दामले यांनी सदर पुस्तकाचा परिचय करुन देताना केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे