दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये आयोजन
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: (दि ४) आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत चेऊलकर यांच्या अध्यक्षते खाली आज (दि ३) इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्तविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर इ.१० वी व इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला तसेच शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर धनराज फड सर, नितिन शिंदे सर, सचिन भंडारे सर व पल्लवी पाटील मॕडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर इ. १० वी ब मधील प्रणेश म्हात्रे या विद्यार्थ्यांने आपले कौशल्य वापरून व मेहनत घेऊन स्वतः एक अतिशय सुंदर लाकडी घड्याळ बनवून शाळेला भेट दिल्याबद्दल व शाळेतील सर्व वर्गात त्याच्या मित्रांच्या सहकार्याने साऊंडबॉक्स बसविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या सर्व साऊंड बॉक्सचा खर्च इ. १० वी ब मधील सर्व विद्यार्थ्यांनी केलेला आहे.
यानंतर इ. १० वी अ, इ. १२ वी कला व इ. १२ वी वाणिज्य या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेला व शिक्षकांना भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत चेऊलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयंत चेऊलकर, खजिनदार सुवर्ण कांबळी, सचिव प्रभाकर म्हात्रे, कार्यकारिणी सभासद सुहास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व इ. १० वी व इ. १२ वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी तर आभार प्रदर्शन कैलास शिकारे सर यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.



