सिर्सी येथील जामा मशिदीत २७ व्या शबे-कद्र निमित्त कुरआन पठण संपन्न
प्रतिनिधी :- अखिल रोडे

सिर्सी येथील जामा मशिदीत २७ व्या शबे-कद्र निमित्त कुरआन पठण संपन्न
हाफिज मुकद्दस रेयान यांचा सत्कार
प्रतिनिधी :- अखिल रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
सिर्सी: (दि १७) रमजान शरीफच्या पवित्र महिन्यातील २७ व्या ‘शबे-कद्र’ निमित्त सिरसी येथील जामा मशिदीत धार्मिक उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी मशिदीचे पेश इमाम हाफिज मुकद्दस रेयान साहब यांनी कुरआन मुकम्मल (पूर्ण) केले.
या महत्त्वपूर्ण धार्मिक कार्याबद्दल जामा मशीद समिती आणि मुस्लिम जमात तर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. जामा मशिदीचे अध्यक्ष जनाब शकील पठाण, सचिव जनाब हनीफ शेख आणि सर्व समिती सदस्यांनी हाफिज मुकद्दस रेयान साहब यांचे पुष्पगुच्छ देऊन इस्तकबाल (स्वागत) केले.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
देशासाठी दुआ: कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक दुआ (प्रार्थना) करण्यात आली.
रात्रभर इबादत: शबे-कद्रचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांनी रात्रभर जागून नमाज, कुराण पठण आणि अल्लाहची विशेष इबादत केली.
या कार्यक्रमाला सिरसी परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीमय वातावरणामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
बेला पोलीस स्टेशन असलम नवरगाबंदे , अमोल कोटवार, वाहतूक विभाग सतिश फुटाणे , अमोल काळे, कुंभारे या पोलीस पथकाने मशिदीच्या परिसरातील गर्दीचे नियंत्रण केले आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही याची विशेष काळजी घेतली. पोलिसांनी बजावलेल्या या चोख कर्तव्यदक्षतेमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता इबादत करता आली. जमात आणि मशीद समितीने पोलीस प्रशासनाच्या या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.



