Breaking
आरोग्य व शिक्षणचंद्रपूरनागपूरपरीक्षण लेखभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

माझी प्रेरणा, माझे बाबुजी

कुसुमलता वाकडे,नागपूर निवृत्त पदवीधर शिक्षिक

0 4 8 2 9 0

माझी प्रेरणा, माझे बाबुजी

माझे वडील ‘जगजीवन हंसाराम मेश्राम’ हे 1965 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेमध्ये हेड बुकिंग क्लर्क होते. वडिलांची भांवडे म्हणजे आमचे काका आणि आजी-आजोबा गोंदिया जिल्ह्यातील काचेवाणी येथे गावाकडे राहत असत. माझे वडील भांवडांत मोठे असल्यामुळे वडीलाचे लग्न होताच, आपल्या चारही लहान भावंडांना आपल्याकडे बल्लारपूरला आणले. आम्ही वडिलांना बाबुजी म्हणायचो. लहान असताना त्यांनी गरीबीचे चटके सहन केले होते. घरी थोडीशीच शेती असल्यामुळे बाबुजी दुसर्‍याच्या सुध्दा शेतात काम करीत असत.अभ्यासात हुशार असल्यामुळे मित्राचा अभ्यास घेण्यासोबत त्यांना अभ्यासातील अडचणी समजवून सांगत असत.त्यामुळेच मित्राचे आई-वडील माझ्या वडीलांना भाज्या किंवा शेतातील कडधान्य देत असत.

माझी आई अतिशय प्रेमळ,वात्सल्यमूर्ती. वडिलाच्या मताशी नेहमीच सहमत असे. माझ्या बाबुजीनी सर्व भांवडांना शिकविले, शिक्षण दिले.बाबुजी आपल्या ड्यूटी कर्तव्याशी एकनिष्ठ होते.बरेचदा त्याच्या मित्राची कर्तव्य पाळी सुध्दा करायचे अडचणीत किंवा बाबुजी संभाळून घ्या म्हटल्यास ते कुणालाच नाही म्हणत नसायचे. वडीलांची मी मोठी कन्या.त्यावेळेस आम्ही रेल्वे क्वार्टरवर राहायचो.बाबुजीना घरी येण्यास उशीर झाला की आई मला टिफीन घेऊन जायला सांगयची. माझे लहान काका तर माझ्यापेक्षा फक्त वर्षानी मोठे होते. लहान दोन काका माझ्या आईला आईच म्हणायचे.शेजारया -पाजार्‍यांनी त्यांना त्या तुझ्या वहिणी आहेत.असे सांगूनही माझ्या आईला ‘आई ‘च म्हणनं कायम.

वडिलाच्या छत्रछायेत व आईच्या प्रेमळ मायेमुळेच माझे सर्वच काका चांगले शिकलेत. मोठे काका पेपरमील मध्ये कामगार होते. दुसर्‍या क्रमांकाचे शिवचरण काकांनी आय.टी.आय.केल्यामुळे ते फिटर झालेत.तिसऱ्या क्रमांकाचे पृथ्वीराज काका नागपूर रेल्वेत टि.सी. तर सर्वात लहान युवराज काका के.डी.नागदा काॅलेज ऑफ काॅमर्स अन्ड साॅयन्स ,गोरेगाव पश्चिम मुंबईला प्राध्यापक तसेच साहित्यीक होते माझ्या काकांना नोकरी लागताच वडिलांनी एकेकांची लग्न लावून दिलीत त्याचा वेगळा संसार थाटून दिला.आजही सर्व काकू-काका माझ्या आई-वडीलाचा आदर करतात.

वडीलांनी आपल्या मुलाबाळांना म्हणजेचं आम्हा भावडांना उच्च शिक्षण दिलेत.आम्ही पाच भांवडे मी मोठी बारावी झाल्यानंतर मला पुढे शिकावयाचे होते पण वडिलाच्या सल्ल्यानुसार मी डी.एड्.झाले व लगेच नोकरी सुध्दा लागली.दोन वर्षातच लग्नाचे चांगले स्थळ जुळून आले.पती आयुध निर्माणी चांदा, भद्रावती येथे सहायक सचिव म्हणून राजपत्रित अधिकारी आहेत. लग्नानंतरही मी घरसंसार, नोकरी सांभाळून समाजशास्त्रज्ञ, इतिहास व मराठी विषयात एम.ए. तसेच बी.एड.पूर्ण केले. यामध्ये वडील व पती अशा दोघांचेही मला सहकार्य लाभलेत. माझी लहान बहीण बालाघाट येथे माध्यमिक शाळेत शिक्षिका असून, एक भाऊ नागपूरच्या खाजगी शाळेत लिपीक ,दुसरा भाऊ बल्लारपूर येथे रेल्वेत तर लहान भाऊ मुंबईमध्ये शाखा व्यवस्थापक आहे. वडिलांनी आम्हा सर्व भांवडांना त्यासाठी आवश्यक त्या सर्वदृष्टीने पुढाकार घेऊन आपले कर्तव्य पार पाडलेत. त्यांच्यामुळेच माझे काका व आम्ही सर्व भांवडे नोकरीच्या माध्यमातून स्थिरस्थावर झालेलो आहोत. वडीलांनी इतरही नातेवाईकांना बरीच मदत केली. सर्वासाठी झटणाऱ्या माझ्या बाबुजीना त्रिवार अभिवादन ! नेहमीच त्याच्या ऋणबंधनात..! माझे बाबुजी माझ्याकरीता तसेच आमच्या कुटुंबाचे प्रेरणास्थान आहेत.

कुसुमलता वाकडे,नागपूर
निवृत्त पदवीधर शिक्षिक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे