‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई
मराठीचे शिलेदार हक्काचे काव्यपीठ
‘आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई
मराठीचे शिलेदार हक्काचे काव्यपीठ
माझ्या ‘अशी असावी कविता’ या रचनेला सर्वोत्कृष्ट बारामध्ये स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप आभार.
बईन पाच वरस मले कवितेचा ‘क’ समजत नवता. पण समूहातील वाचून वाचून कसाबसा सिकलो. आणं आता मिच तुमाले ग्यान पेलून रायलो अशी असावी कविता मूण. माये मलेच हासाले येते आणं प्रश्न बी पडते काउन तुमी मले डोस्क्यावर घेतलं, लय भेव वाटते जी. तुमी सोल्याच्या झाडावर नेंगवून माहा आधार काढला तं झाली ना पंचायत राजे हो ,कसीतरी फूकाचं खाले देवून बूड्डी पोसते मले. मंग लंगड्या लुल्याले कसी पोसन. मोकाट ढोराले चारा नायी मणून माह्यापूडं मेरवन मांडणं बंद केलं तं आली ना आफत..!
मले आता तुमचं वाचून जरासं लिवाले जमते. पण तुमचा लयी हिरस वाटते बाप्पा. का का शब्द वापरता तुमी माया…..तं सप्पा डोस्क्यावरून जाते. हे परीक्षक असे भारी लिवतेत आणं त्यायचे सवाल-जवाब असे भारी भारी रायतेत का मले प्रश्नच पडते हे कोणत्या चक्कीचा आटा खातेत बा.
एकगण विष्णु सर मले मणे चिंतन, वाचन करा मी (विष्णु सर) पोथीचं वाचन करतो तं आपसूकच शब्द आठवते मणे. पण बइनमाय माया घरी रोजच पुराण चालते सकाळी उठून चादरीची घडी या माणसाले जमत नायी पासून तं राती पाय दाबून देतानी या माणसात जरा बी जोर नायी पर्यंत. आता या बुड्डीले कोण सांगण माहं रगत हिनच पेलं मणूण. असो बाप्पा मले एकूलती एक बुड्डी हाहे तुमी तिच्या मोरं चुगली कराण तं पुना नविनच आफत..! ‘असेच पिरम रावू ध्या बाप्पा मणजे सप्पा मिरवलं..’
✍️मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह





