Breaking
क्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अठरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : प्रेम बंधनात मी🌤️*
*🔹गुरूवार : १३/ ०३ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*प्रेम बंधनात मी*

प्रेम बंधनात मी अडकले
साजणा तुझीच मी झाले
स्वप्न होते मनी पाहिलेले
आजला ते साकार झाले

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

ठाव अंतरीचा घेता
भाव नजरेतील कळले
प्रीत तुझ्यावर जडता
प्रेम बंधनात मी अडकले

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

चंद्राची जशी चांदणी
नील‌आकाशी देते साथ
तुझ्या प्रेम बंधनात मी
संसारद्वीप उजळेल आनंदात

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

तुझ्या प्रेम बंधनात मी,
तुही प्रेम बंधनात असावे,
फक्त प्रेमदिवसा पुरते नसावे,
प्रेमाचे स्वप्न साकार व्हावे//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

नको मला माणिक मोती
नको मला खूप पैसा,प्रतिष्ठा..
गुतंले तुझ्या प्रेम बंधनात मी
राहो कायम तुझी प्रेमावर निष्ठा..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

अंधारल्या जीवनात माझ्या
प्रितीची पाहाट झाली
प्रेम बंधनात अशी मी
कृष्णाची राधा झाली

*सौ.तृप्ती वंजारी तुमसर. भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*प्रेम बंधनात मी*

सुखदुःखाची भागीदारीन मी
बांधले तुला प्रेम बंधनात मी
साथ सोडणार नाही कधीही
रमले तुझ्या संसारात मी

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

प्रेम बंधनात मी तुझ्या
जन्मांतरीचे बांधले नाते…
या प्रेम दिवसात तुझेच
सखया मी प्रेमगीत गाते…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

दिल्या घेतल्या वचनांची
आजही मनी आहे आठवण
प्रेम बंधनात मी प्रियतमे तुझ्या
करतो जन्मजन्मांतरीची साठवण

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

*तुझ्या प्रेम बंधनात मी*
*गेलो गं पुरता गुरफटून*
*ठेवू सामंजस्य एकमेकांत*
*गैरसमज नको करु घेऊन*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

माझे तुला वचन आहे प्रिये
प्रेम बंधनात मी सदैव राहिन
जीवापाड तुला जपेन मी
या दुनियेला विसरून जाईन

*प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

तुझ्या प्रेम बंधनात मी
आजन्म राहीन देतो हमी
मी तुझा अन् तू माझीच
तूच हवीय मला जन्मोजन्मी.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

जोवर आहे या श्वासात श्वास
प्रेम बंधनात मी तुझ्या फक्त
समजू नकोस गं कान्हा मला
मी आहे परम रामाचा भक्त

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

माझ्या हृदयी तुलाच गोंदिले
सख्या प्रेमबंधनात मी अडकले
तू मात्र प्रवाह इतके बदलले की
तुझे खरे रंगरूपच नाही उमगले

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

अडकले रे प्रेम बंधनात मी
नाही सोडणार आता तुला मी
हा जन्मोजन्मीचा आहे नाता
जिवापाड प्रेम करणार मी

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

प्रित वेड्या अडकले
कशी,प्रेम बंधनात मी,
असावा,हाती हाथ तुझा
अन सामोरी उभी मी.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

तुझ्या करारी बाण्याला
कळले ना कशी भूलले मी
संसार विणतांना कळले
तुझ्या प्रेमबंधनात मी

*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
*प्रेम बंधनात मी*

नाते जुळले प्रितीचे
गुंतले तुझ्यात सख्या मी
अतूट विश्वास तुझ्यावर
म्हणून प्रेम बंधनात मी

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🩷🌷🩷♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे