
0
5
4
7
4
5
अक्षरलेणी
अक्षरांशी झाली ओळख
मैत्री झाली अक्षरांशी
अक्षरांशी बोलू लागलो
खुलले नाते ह्रदयाशी
अक्षर अक्षर धावत आले
माळ गुंफली अक्षरांची
अक्षर अक्षर जुळून आले
शब्द फुलले माझ्या वाची
अक्षरांचे चित्र सुरेख
अक्षरलेणी दिसे मोहक
अक्षरासवे शब्द बहरले
शब्दा शब्दात विवेक
शब्दासवे वाक्य फुलले
वाक्यासवे भाषा सम्रृधद
भाषा मी बोलू लागलो
ह्रदयी फुले आनंद
अक्षरलेणी असे सुबक
आकार,ऊकार,मात्रा सुंदर
निर्मळ असे ह्रदय तयाचे
गीत गाऊ आपण सुस्वर
पुरुषोत्तम ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
=========
0
5
4
7
4
5



