पिकल बॉल’ खेळासाठी अद्ययावत क्रीडांगण
पुण्यात उदघाटन समारंभ थाटात संपन्न
‘पिकल बॉल’ खेळासाठी अद्ययावत क्रीडांगण
पुण्यात उदघाटन समारंभ थाटात संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे दि.16(प्रतिनिधी) सध्या भारतात विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यात येत असून खेळांकडे तरूणांचे वाढते आकर्षण बघता, त्यांचा उत्कर्ष होण्याच्या उद्देशाने “एस ॲॅली” यांच्या वतीने अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने औंध येथे ‘पिकल बॉल’ खेळाचे अद्ययावत कोर्ट्स निर्माण करण्यात आले आहेत. पाकल बाॅल हा क्रीडा प्रकार आता परदेश ईतकाच भारतातही लोकप्रिय होत आहे. म्हणून या खेळाचे कौशल्य आत्मसात करू इच्छिणा-या खेळाडूंसाठी खास ‘पिकल बॉल’ या वैशिष्ट्यपूर्ण खेळासाठी सर्व सोयींनी युक्त असे तीन कोर्ट्स येथे निर्माण करण्यात आले आहेत. तरूण क्रीडा प्रेमींच्या जल्लोषात नुकतेच या कोर्टसचे उदघाटन पुण्याच्या सोलारीस क्लबचे संचालक मा. जयंतराव पवार आणि इंजिनिअर देवयानी राहुल पवार यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आले.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर या नव निर्मित क्रीडांगणाची विधीवत पुजा केल्यानंतर आता हे क्रीडांगण सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध झाले आहे. इंजि.राहुल पवार यांच्या मार्गदर्शनात सौ.पुनम पवार यांच्या सहकार्याने देवयानी पवार व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन पटू श्री.यश शाह यांच्या प्रयत्नातून हे क्रींढांगण साकारले आहे. डांबरयुक्त तीन कोर्ट्स हे आधुनिक तांत्राने निर्माण केलेले कोर्ट खेळाडुंना खेळताना ईजा होण्यापासून वाचवणारे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष असलेली ही रचना अतिशय आकर्षक असून सुंदर रंगसंगती खेळती हवा, उत्कृष्ट बैठकव्यवस्था या सुविधांनी युक्त आहे. खेळाडूंना कॅफे व विश्राम गृह यासह सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.
खेळातील अत्युत्तम प्रगतीसाठी भविष्यात अशा उच्च दर्जाचे स्पोर्ट कौर्ट्स क्रीडाक्षेत्रातील मानबिंदु ठरतील , अशी आशा जयंतराव पवार यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. खेळाडूंना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे तसेच खेळांचे ही मोठे प्रथितयश क्षेत्र आहे, अनेक नामवंत खेळाडू या शहराने क्रीडा क्षेत्राला दिले आहेत. या नवनिर्मित कोर्टसचा लाभ घेऊन सर्व तरूणांनी पिकल बाॅल या खेळाचा आनंद घ्यावा.
या उदघाटन कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय किर्तीचे फिटनेस कोच मिहीर तेरणीकर यांच्यासह श्री. राजाजी पवार, राहुल पवार, मयुरी शाह व जय पवार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. इंजि. देवयानी पवार यांनी या खेळाविषयी माहिती देताना सांगितले की, सन १९६५ मध्ये वॉशिंग्टन येथे बीलबेन, मॅकलबिन आणि जो पिचर्ड या तीन मित्रांनी या खेळाचा शोध लावला असून इनडोअर व ओपन अशा दोन्ही प्रकारे हा खेळ खेळला जातो; तसेच या खेळातून साध्य होणारा सर्वांग सुंदर व्यायाम छोट्यांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आनंददायी आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे पुण्यात विमाननगर येथे देखील “एस ॲली” यांनी म्हाडा कॉलनीत कोर्टस निर्मिती केली असून आहिल्यानगर येथेही असे कोर्ट निर्मिती करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्रसिध्द खेळाडू यश शहा यांनी दिली. या नवनिर्मित कोर्टवर आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा भरवण्यात येणार असून त्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देऊन इंजिनिअर राहुल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुणे शहरातील विविध क्रीडाप्रेमी, खेळाडू व त्यांचे कुटूंबिय आणि मित्र परिवार कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.



