
0
4
0
9
0
3
नारळी पौर्णिमा
आभाळ भुईला टेकलं
तुफान वारं हे सुटलं
नारळी पौर्णिमा येता
उधाण दर्याला आलं
सण हा आला वर्षाचा
कोळीराजा हा आनंदला
नाचगाण्यात दंग सारी
सोन्याचा नारळ दर्याला
नभात खुलतो चंद्रमा
रुपेरी चंदेरी ही रेती
मनाला हर्षाची भरती
लाटा या नर्तन करती
मासमारीचा प्रारंभ होता
शिडात वारं हो भरते
सांबाळ माज्या धन्याला
समिंदरासी हाक मी देते
रक्षाबंधन दिन सोन्याचा
भावा बहिणीच्या प्रेमाचा
रेशमी बंधन हे राखीचे
मानबिंदू आपल्या संस्कृतीचा
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
0
9
0
3





