Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

प्रेमरहस्य

सविता धमगाये आनंद नगर, नागपूर

0 6 3 9 5 2

प्रेमरहस्य

हिरवा निसर्ग सढळहस्ते
नटवितो फुलाफुलांनी रस्ते
पाखरांची किलबिल नभी
सृजनता कणाकणात वसते

निनादतो डोंगरदऱ्याखोऱ्यातून
वारा वाहतो कडेकपारीतून
वाट कोण अडवेल त्याची
पिंगा घालीत करतो गुणगुण

उंच उंच गिरीशिखराहून
उडी मारते सरिता उंचाहून
ओलांडून जाते खडतर वाट
भेट सागराची ओढ अफाट

नभात कुठेही टिपूस नसतांना
अचानक जलद येतात भरून
चिंब भिजवून वंसुधरेला
अवघ्या सृष्टीला पुरते उरून

पहाता ते एक एक नवल
नकळत फुलते वदनी हास्य
सृष्टीचे ते फुलणे बहरने
गुढ अजब आहे ना प्रेमरहस्य

सविता धमगाये
आनंद नगर, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे