Breaking
नागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

संस्कारमय शिदोरीतील साठवण ‘आई माझी’; स्नेहल काळे

0 4 8 2 9 4

संस्कारमय शिदोरीतील साठवण ‘आई माझी’

मैं छाया तेरी, तू आँचल मेरा
तू ममता मेरी,मै हू लाल तेरा

मीठे मीठे डाँट तेरे याद है मुझे
नाजूक से थाप तेरे याद है मुझे

माँ मेरी तू मेरा जन्नत जहान
माँ मेरी तू मेरा आसमान…!

हे एका प्रसिद्ध अल्बम मधील हृदयस्पर्शी गीत. प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आणणारं. मनाला क्षणात भावूक करणारं खरंच आहे ते, ‘आईसारखे दुसरे महान दैवत नाही’. कितीही तिची महती शब्दात वर्णिली तरी तिच्या कर्तुत्वापुढे, महानतेपुढे सारेच फिकेच .’आई’ ही एक अनमोल देणगी आहे.नशीबवान माणसाच्या वाट्यालाच ती येते. मी स्वतःला फार नशीबवान समजते, की माझ्या आयुष्यात माझी प्रेमळ, मायाळू, साधी भोळी, कष्टाळू, कुटुंबवत्सल, सर्वांची मने जपणारी, संस्काराची बीज मनात रोवणारी माझी आदर्श ‘आई’ आहे. खरंतर माझी आई फार साधी सोज्वळ कायम संसारात रममाण होणारी अशी आहे. लहानपणापासून आमच्या बहिण भावांना संस्काराची अन् सदगुणांची शिकवण देणारी. आज जे मी घडले ते केवळ आणि केवळ माझ्या आईमुळेच.

‘आई माझा गुरु, ते तपासून माझे अस्तित्व सुरु’ पाककृतीत तरबेज असणारी, स्वादिष्ट व रुचकर पदार्थ बनवण्यात हातखंडा असणारी माझी आई. तिच्या एका गोष्टीचं मला कायम नवल आणि अभिमान वाटत राहतो आणि राहील. कंटाळा, आळस हे शब्दच मुळात तिच्या शब्दकोषात नाहीत. उत्साहाचा अखंड झरा, घरात कोणताही कार्यक्रम असो हिररीने भाग घेणारी आणि तितक्याच निष्ठेने पार पाडणारी अशी माझी माऊली. आदर्श जीवन कसं जगावं हे माझ्या आईकडून शिकावं. माझी आई, फक्त आई नाही तर; ती माझी गुरु, उत्तम मार्गदर्शक आणि प्रेमळ मैत्रीण आहे. आयुष्यातलं हर एक सुख दुख मी तिच्याबरोबर शेअर करते. जिथं माझं चुकतं तिथं ती माझी कडक शब्दात कान उघडणी करते आणि चांगल्या कामाचं पण तितकच तोंड भरून कौतुक करते.

आई मला कायम सांगत राहते, “सगळं करावं माणसानं पण दुसऱ्याचं कधी मन दुखवू नये”. त्यासारखं या जगात पाप नाही. ‘दुसऱ्यांनी वाईट केलं तरी आपण चांगलं त्याच्याशी वागाव ही तिची शिकवण’. आईने आयुष्यभर आम्हाला संस्काराची शिदोरीच दिली. 2014 साली माझी बदली पाटणला झाली, तेव्हा माझ्या मुलांचा सांभाळ तितक्याच ममतेने माझ्या आईने आणि संजूने केला. कधी माझी उणीव भासू दिली नाही. माझा वेदू आणि माझी ताई म्हणजे तिचे जीव की प्राण. हेवा वाटावा अशी माझी आई.

काव्यात काय मी तिचा महिमा वर्णावा, शब्दही अपुरेच. ‘देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला ‘ हे ‘मोलकरीण’ या 1963 मध्ये गाजलेल्या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेले गीत कानावर पडले की क्षणात डोळे टचकन ओले होतात. मन उचंबळून येते. भावना शब्दाचे रूप घेऊन कागदावर उतरतात. हे सगळं होतं ते केवळ तिच्या वात्सल्यामुळेच. शेवटी देवापुढे हात जोडून एवढीच नम्र आर्जव, ‘कायम माझ्या शिरी माझ्या आईचा हात राहो’, माझ्या चांगल्या कामांना तिच्या शाबासकीची थाप मिळो आणि माझे पण आयुष्य माझ्या आईला मिळो. प्रेमाचा ओलावा कधीच संपू नये. ‘LOVE YOU SO MUCH MUMMA…’

स्नेहल काळे
फलटण,जि.सातारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे