0
4
8
2
9
0
माझी वाटच वेगळी
गुलाबी आशेने बहरलेली
रंगबिरंगी सुखानी मोहरलेली
प्रेमाच्या पायघडीने सजवलेली
स्वप्नातील माझी जीवन वाट
पण, जीवन समजायला लागले
नात्यातले गुंतागुंतउमजू लागले
जबाबदारीने मनही झुकले
सोनेरीस्वप्न डोळ्यातच विरले.
कारण; अति भाऊक होऊ नये
जिव्हाळ्याचा पूर वाहू नये
आपुलकी नको तिथे सांडू नये
खऱ्याच्या न्यायासाठी भांडू नये
कलियुगात खरं टिकत नाही
प्रेम,माया काळजी विकत नाही
निस्वार्थीपणा पटत नाही
मतलबी जवळून उठत नाही.
इच्छा अपेक्षा विसरून सगळे
निर्विकार जीवन जगावें वेगळे
उपकाराचे नको आता ठिगळे
मला स्वच्छंद उडायचे मोकळे.
आनु/बेबीताई बोईनवाड
ता. जि.नांदेड
=========
0
4
8
2
9
0



