ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरवर्धाविदर्भसाहित्यगंध
फितूर इथेच आहेत
पवन सु. किन्हेकर बोरगाव, जि.वर्धा

0
5
2
4
6
3
फितूर इथेच आहेत
फितूर इथेच आहेत
इथेच मिळे गद्दार पहाया
टपलेली कीड पोखरे भूमी
फितुरकीचा वार कराया ||
आपलीच माणसे होतात
आपल्याशी रे वैरी
पाठीत खंजीर खुपसतात
दुश्मनी वाढवते दरी ||
याच समूहात मोठे झाले
नावारूपास येऊन विसरले
महाशय बनले विद्वान
द्रोह करीत ताशेरे ओढले ||
वरचढ वर्चस्व प्रस्थापित
करून बघितले दांडगाईने
भपकेबाज पाळेमुळे रोवले
हाणून पाडले कावे शिथाफीने ||
आतूर झाले कुचेष्टा विकार
बदनामीसाठी प्रयत्न प्रसार
कटकारस्थानांचा करे धिक्कार
‘पवन’ म्हणे हाकलू रीतसर ||
पवन सु. किन्हेकर
बोरगाव, जि.वर्धा
0
5
2
4
6
3



