
0
4
8
2
8
6
पारंब्या
वडाच्या पारंब्या लांब लांब
मला म्हणतात थांब थांब
इकडे तिकडे मग मी पाहिले
खर का मज पारंबी बोले
होईना हा मला सहन एकांत
म्हणून होतो मग आकांत
एकेकाळी मुलांचा मी झुला
माहिती आहेच हे तर तुला
आनंदी व्हायच मन माझ
नि तृप्त व्हायचे कान
झुल्या बरोबरच तुम्ही
गाणं म्हणायचात छान
आता मात्र आम्ही मुलांच्या
खिजगणतीतही नाही
कारण त्यांच्या हातात आता
सतत मोबाईल राही….
सतत मोबाईल राही…
शारदा जोशी कुलकर्णी
ता. गेवराई, जि.बीड
0
4
8
2
8
6



