0
4
8
2
9
7
सोनेरी रंग
उगवतीच्या आरुषीची
भुरळ पडलीय मनाला
सोनेरी रंग त्या नभीची
चैतन्य भरती या तनाला
आरुषीचे मोहक ते रूप
खुणावते कसे नभातून?
रामप्रहरी पाहावे स्वरूप
वीज चमकते रे तनातून
पाखरांची शाळा भरली
मोहित करते बेधुंद शीळ
मिलनाची ती रात्र सरली
उठून दिसे गालावर तीळ
सोनेरी रंग पाखरू बेभान
विसरून देहभान विहारते
शुभ सकाळी हृदयाचे पान
स्पर्शाने आरुषीच्या शहारते
सूर्यास्ताची चाहूल पक्षांशी
सांगते कानी रे भेटीची आस
सोनेरी रंग तुझे ते आरुषी
ऊर्जा देणारीच आहेत खास
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
0
4
8
2
9
7



