Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

जि.प. प्रा शा. मालेवाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात

भिवापूर/मालेवाडा प्रतिनिधी, रजत डेकाटे

0 5 1 6 5 1

जि.प. प्रा शा. मालेवाडा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन

भिवापूर/मालेवाडा
प्रतिनिधी, रजत डेकाटे

भिवापूर: (दि २८) तालुक्यातील मालेवाडा येथील जि.प. शाळेत आज (दि २८) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

जि प मालेवाडा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वातीताई सहारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महान शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण व अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेले विज्ञानासंदर्भातले साहित्य शाळेत प्रदर्शनात मांडण्यात आले आणि प्रयोगाबाबत मान्यवरांना त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली.

आयोजित विज्ञान प्रदर्शनात घराची प्राकृती, हवेचा दाब बिस्किट प्रयोग, पाणी शुद्धीकरण प्रयोग, पाण्याचा पृष्ठीय तान, पाण्याचे घनता असे एक न अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी करून दाखविले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत विज्ञान युगात भर देण्याचे काम शाळेतील शिक्षक हे करीत असतात. उत्कृष्ट साहित्य तयार करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. गावातील नागरिकांनी प्रदर्शनीला भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना शिक्षिका माधुरी इमाने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुरज लाल येल्ले यांनी केले तर आभार वर्षा चापले यांनी मानले. यावेळी शिक्षिका भुनेश्वरी सातपुते, शिक्षण सेवक अजय झोडापे, रमेश लोनगाडगे,समिर पडोळे,रामू लाखे, अरुण रामटेके, सचिन सूर्यवंशी, अंगणवाडी सेविका रंजना गेडाम, पोलीस पाटील इंदू गेडाम हे प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे