0
4
8
2
9
0
अर्थ
क्षितीजाच्या बाहुपाशी
उदास सांज विसावली
अधरावरी उमटल्या
विराणीच्या स्वरावली
क्षितीजावरी दाटलेला
सांज रंग मम मनीचा
कुंतली रिमझीमला
थेंब थेंब मोतियाचा
लाभला तव जवळी
जन्मभरीचा विसावा
क्षितीजा सांगता सांज
प्रेमार्थ मनात असावा
कुशीत तुझ्या मायेचा
नितळ, वाहता झरा
तव मनाच्या कोंदणी
जणू मी सजले हिरा
क्षितीजाचा आश्वासकसा
स्पर्श लहरतो अंगांगी
हळूच लाजली ही कशी
भावभरी होत कोमलांगी
अर्थ गवसला खरा तिला
आज तिच्याच जीवनाचा
प्रेमरंगात रंगलेल्या
नवथरशा नव भावनांचा
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली,जिल्हा सांगली
================
0
4
8
2
9
0



