Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

लाटेवर

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 5 9 4 1 4

लाटेवर

उम्मेदीच्या काळात होतो
आरूढ गर्दीच्या लाटेवर
मात्र चालतो एकटाच मी
इथे मावळतीच्या वाटेवर.. //

उगवतीला होतो सलाम
हा सृष्टीचा अटळ नियम
त्याचेच पाईक सारेजण
जो तो आहे ठाम कायम.. //

ज्यांचे ओझे सहजपणे
कधी खांद्यावर वाहिले
मात्र तेच बगल देताना
आज निमूटपणे पाहिले.. //

थकलेल्या देहापासून
सारे नकळत लांबतात
इथे वटलेल्या झाडावर
पक्षी तरी कुठे थांबतात… //

अंती जमून सारे एकदा
क्षणभर मौन पाळतील
दावून नाना ‘आव’ ‘भाव’
हळूहळू सारेच पांगतील.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे