Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियाब्रेकिंगमुंबईविदर्भ

‘रितिक रोशन गजभिये’ची राज्यस्तरावर झेप; एथलेटीकमध्ये दमदार कामगिरी

प्रा. तारका रुखमोडे, प्रतिनिधी

0 5 8 2 3 9

‘रितिक रोशन गजभिये’ची राज्यस्तरावर झेप; एथलेटीकमध्ये दमदार कामगिरी

न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी

प्रा. तारका रुखमोडे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

गोंदिया/अर्जुनी मोर, (दि ६) : गोंदिया येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय अंडर-२३ एथलेटिक्स स्पर्धेत न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता १२ वीच्या रितिक रोशन गजभिये याने आपल्या वेगवान कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रितिकने ११० मीटर हर्डल्स स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. तसेच १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची छाप उमटवली.

या दमदार कामगिरीच्या बळावर रितिकची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय एथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रितिकच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष यशवंत परशुरामकर व सचिव ओमप्रकाशसिंह पवार प्राचार्य सुरज मोटघरे, ज्युनियर विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा.तारका रुखमोडे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेतही तो अशीच उज्ज्वल कामगिरी करून यशाचा झेंडा फडकावेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 2 3 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे