Breaking
कविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 8 0 4 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : कासवगती आमची📘*
*🔸मंगळवार : ०४ /ऑगस्ट /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कासवगती आमची…*

कासव गती आमची,
हळूहळू रोज चालतो…
घाई कधी न करता,
ध्येयाकडे मग वळतो…

कासव गती आमची,
पाऊल पुढे टाकतो…
छोटासा प्रयत्न रोज,
यश जवळी रे आणतो…

कासव गती आमची,
आळस कधी नको…
चिकाटीने काम करू,
हार कधी मानू नको…

कासव गती आमची,
संयमाची ही रीत…
सातत्याने चालत राहू,
यशाची गाऊ गीत…

कासव गती आमची,
बालगीत आम्ही गातो….
पुस्तक खूप वाचतो,
कविता करत राहतो….

*शैलेश शिवाजीराव गायकवाड*
*विंचूर, नाशिक*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

सोहम, यश, नीला आहेत मस्त
राहतात नेहमी बिनधास्त…

अभ्यासात जरा मागे असतात
कासवगती आमची असं म्हणतात…

अभ्यासाची घाई कधीच नसते
खेळायची गडबड मात्र असते…

मुलं तर मेहनती आहेत बरं
पण अभ्यास करतील तर खरं…

अभ्यास केला तर पास होणार
आई-बाबा मग खुशीत येणार…

परीक्षेच्या वेळी अभ्यास करतात
चांगल्या गुणांनी पास होतात…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

कासवगती आमची लई भारी
हळूहळू मंजील गाठतो
नाही कधी घाई करत
आरामात उशीरा उठतो

थोड्या थोड्या प्रयत्नान
यश जवळ खेचून आणतो
कासवाची गती आहे आमची
संथगतीन पाऊल पुढे टाकतो

आळस अंगात नसे कधी
चिकाटी , जिद्द असे मनात
आत्मविश्वासन पाऊल पुढे
वेग नसला तरी सावकाश चालत

संयमातून मार्ग काढत
बुद्धीकैशल्याचा वापर करत
चाल आमची कासव गतीची
सातत्यपूर्ण आम्ही चालत

कासव गती आमची न्यारी
यशाच शिखर गात भारी
कष्टातून उभारत जीवन
चला आनंदान जगा सारी

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीच शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

कासव गती आमची लई
सावकाश जाते बाई
त्याला नसते घाई
मारत नाही बढाई ॥१॥

पण करतो चढाई
घेऊन कवच डोई
दबकत चाले भुई
मान डुलवत जाई ॥२॥

झोपाला नको रुई
करत नाही लढाई
सर्वात ठरतो सवाई
चारचौघात शिष्टाई ॥३॥

नाही त्याची दांडगाई
वागणं असत नरमाई
नसतो तो भागुबाई
वाटते सर्वांना अपूर्वाई ॥४॥

कामात नसते दिरंगाई
सर्वांशी त्याची दिलजमाई
वाटते त्याची नवलाई
करत नाही,कुणाची धुलाई॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

आम्ही नाही ससा
धावत नाही वेगात
सातत्याची कास
हाच ठाव असे मनात l

ध्येय आमची उरात
पुरी करण्यास बळ आहे करात
नाही धावणार वेगात ,
पण कासवगतीने यश नक्कीचं मिळवणार l

आळस नाही आमच्यात
कष्ट करण्याची आहे हिंमत आमच्यात
पाऊल पाऊल उचलणार …
ध्येय नक्कीचं गाठणार l

आला होता थकवा
मोहही वाढून ठेवला होता ताटात
ऊन – सावलीचा करावा स्वीकार
हेचं दाटलंय मनात l

आळसाचे लोभ येईल जीवनात
पण नाही त्याच्या पडणार मोहात
लांब दिसणारे शिखर …
सातत्याने नक्कीचं गाठणार l

स्पर्धा करू स्वतःशी
स्वतःच्या ध्येयांशी
जिद्द , मेहनत , चिकाटीची…
आस ठेवू उराशी l

*सौ. सुमन विजय शेवाळे*
*जिल्हा नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

सुरवातीला कासवगती
नंतर वाढवू आपली गती
कासवगती आमची मारक
वाढवू गती असे तारक

धीमी चाल नको रे नको
चालीत अपुल्या गती असो
जरी असेल कासवगती
चिकाटीने फुलवू महती

कासवगतीने करी भ्रमण
प्रयत्नांनी करू मार्ग क्रमन
यश मागे धावेल अपुल्या
मार्ग होईल सुलभ अपुला

श्रम करण्यास घेऊ ध्यास
यशाचा फुलेल सुवास
वाढवू गती अभ्यासात
कासवगतीवर करू मात

मनावर ठेवू ताबा
प्रयत्न करू आपण बाबा
कासवगती असे जरी
वाढवू गती आपण खरी

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

गडबड नाही गोंधळ नाही
घाई नाही की कुणाशी स्पर्धा
नाही बस काम करत राहतो
कासव गती आमची थांबत नाही

श्रम वाया जात नाही जरी
करतो हळूहळू काम तरी
काम आमचे थांबत नसते
म्हणून आमचे अडत नसते

कामाच्या सातत्याने असतो
आमच्यात नेहमीच उत्साह
काम सुरूच असल्यामुळे
कामाचा बोजा वाटत नाही

म्हणत आम्हा कोणी कासव
गती तुमची आम्हा काही वाटत
नाही काम करतो हेचं सूत्र
लक्षात ठेवतो नि करत राहतो

दिलेला अभ्यास रोज करतो
रोजचे काम रोजच करतो
म्हणूनच अभ्यासात आणि
खेळात आम्ही पुढे असतो

ससा आणि कासवाची गोष्ट
माहित आम्हा कासव गती देई
जीवन जगण्याचा यशस्वी मंत्र
म्हणूनच कासवगती आमची गती

*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा ,अमरावती*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

हिरवं जंगल, सुंदर वाट
कासव चालला सावकाश
कासव गती आमची बघा
हळूहळू आहे आमचा प्रवास

कासव हसून म्हणाला
धावू नकोस रे घाई घाई
मी जरी हळू चाललो तरी
माझी गती कधी थांबत नाही

शर्यत ठरली दुसऱ्या दिवशी
सगळे प्राणी जमले तिथे
सुरू झाली शर्यत मोठी
ससा धावला भराभर पुढे

अर्ध्या वाटेत ससेदादा थकले
झाडाखाली जाऊन पहुडले
कासव यायला वेळ लागेल
असा विचार ससोबाने केले

इकडे कासव थांबला नाही
एक एक पाऊल पुढे टाकले
ऊन असो वा वारा असो
त्याने कधी हार नाही मानले

ससा जागा झाला तेव्हा
कासव दादा लाईनवर राहिले
सगळे टाळ्या वाजवू लागले
कासव दादा शर्यत जिंकले

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

काम कोणतेही असो
असावे त्यात सातत्य
कासवगती आमची
अभ्यास करतो नित्य

मला नाही जमणार
नको असा विचार
करा सतत अभ्यास
आत्मसात ज्ञानसार

वेगाने केले पाठांतर
नंतर झोपलो सुस्त
येणार तेव्हाच यश
राहून सदा व्यस्त

ध्येय आपले गाठण्या
हवी प्रयत्नांची कास
कासवगती सातत्याने
जागवते जीवनी आस

होश आणि जोश मिळून
येईल अभ्यासात यश
केवळ गती वाढवल्याने
अपघाताचा राहतो शक

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

कासवगती आमची असे
प्रयत्नात कुसुर कधीच नसे
वाटली जरी कासव गती
चालवतो आम्ही मती.

आजचे काम आजच करा
वर्गात सांगतात बाई
वेळ परत येत नाही
रोज सांगते आई.

नको कुणाशी स्पर्धा
नको कुणाशी चढाओढ
गुरुजनांची आज्ञा पाळणे
बोलणे ठेवतो गोड.

मुंगी होऊन साखर खाऊ
कणाकणाने विद्या मिळऊ
धावता धावता येईल गती
अभ्यासात होईल प्रगती .

*सौ विमल धर्माधिकारी*
*ता वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
*कासवगती आमची*

शाळेच्या कामात मी सगळ्यात मागे,
मंद आहेस! म्हणत चिडवती मित्र सारे.

सगळेच माझ्यावर फिदीफिदी हसत,
मी धावत जाई आईकडे रडत रडत.

आईने सांगितली ससा-कासवाची गोष्ट,
माझ्या मनात चमकली एक कल्पना मस्त.

मित्रांनाही ती गोष्ट मी सांगितली,
कासवगतीची खरी ताकद त्यांना ही कळली

घाई संकटाला नेते अनेकदा साथ,
संथ पण सातत्याने मिळते यशाची वाट.

माझे म्हणणे साऱ्यांना पटले लागलीचं ,
कासवगतीच जिंकवते जीवनाच्या शर्यतीत.

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐢🌈🐢♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 0 4 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे