0
4
8
2
9
4
गजरा
सखे ..मज पहा जरा
अरे वेड्या थांब जरा
मज घाई किती बघ…
आवरते कामाचा पसारा
सखे ..मज पहा जरा
गप रे गोड छोकरा…
तुझे दिसणे की बहाने
गुलाबाचा नजर इशारा
सखे ..मज पहा जरा
बघ मी फुललो मोगरा
साडीवर शोभतो खरा
सुंदर सुगंधी गजरा.
सखे ..मज पहा जरा
तरु वेली गोड हसे..
तुझ्या अंगणी फुललो ग
प्रयास आमचा तू सुंदर दिसे
सखे..मज पहा जरा
पण ही संसारात वेडी
मुले..नवरा..घर करता
बांधली जबाबदारीची बेडी
सखे ..मज पहा जरा
फुलेच ती कशी विसरतील
डोळे बंद करा ह…मॅडम
मुलेच ती गजरा देतील..
वाटतं कधी कधी…
लक्ष नाही कुणाचं आपल्याकडे
पण मुले देवा घरची फुले…
हळूच येवून सखे ..खुदकन हसे
सिंधू बनसोडे
इंदापूर.पुणे
==========
0
4
8
2
9
4



