“मनोगतीय आभार”; विष्णू संकपाळ
मुख्य परीक्षक सहप्रशासक
“मनोगतीय आभार”; विष्णू संकपाळ
रात्री एक वाजताच दादांचा मेसेज “तुमचा फोटो पाठवा” पाहिला. मात्र सकाळी. विनाविलंब फोटो धाडला.. यथावकाश समूहात माझी ‘शिदोरी’ ही रचना सर्वोत्कृष्ट पोष्टरवर झळकलेली दिसली. पोष्टरवर सन्मानित होण्यात एक आगळाच आनंद असतो. विषय आल्याक्षणी विचार केला आणि नुकतेच लग्न होवून सासरी चाललेल्या लेकीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
आजकाल लग्न जमवणे अवघड आणि घटस्फोट सोपे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लेकीला कोणत्या संस्काराची शिदोरी माहेराकडून द्यावी हे विशेष महत्वाचे वाटले. स्त्रीच्या हातात दोन्ही घरची इभ्रत असते. माहेर भक्कम असले तरी जन्म सासरी काढावा लागतो. पाठीराखा भाऊ खंबीर असला तरी पत्नीच्या जबाबदारीप्रती गंभीर बनावे लागते. पोरीच्या सुखासाठी संकटाचे तांडव समर्थपणे झेलणारा बाप, मांडवात मात्र कोसळतो.
‘लेक ही केवळ लेक नसते’, तर प्रसंगी आई असते. अशा अनेक भाऊक प्रसंगांनी मांडव सुद्धा गहिवरतो.. गणगोत मागे खेचते तर मनमित पुढे ओढतो.. अंगाई आणि भावगीताचा संघर्ष लेकीला करावा लागतो.. आणि धीरोदात्तपणे तिच्या भावाला मुराळी होऊन शिदोरी घेऊन सासरी पाठवावे लागते.मन कातर करणारा आशय परिक्षकांना भावला आणि लेखणीचे सार्थक झाले.
समूहात आल्या क्षणापासून आजपर्यंत शेकडो सन्मान पदरात पडले. कविता समृद्ध होत गेली.. आ. दादांनी परिक्षकाची जबाबदारी पण सोपवली. मात्र ज्येष्ठांच्या छायेत वावरताना कायम विद्यार्थी रहाणेच पसंत केले. कारण अजूनही खूप काही शिकायचे आहे.
समूह प्रमुख आदरणीय राहूल दादा, मुख्य परिक्षक आ. सविताताईजी, सचिव आ. पल्लवीताईजी, ज्येष्ठ परिक्षक आ. वैशालीताईसाहेब, आ. स्वातीताईंजी, आ. वृंदाताईजी, आ. शर्मिलाताईजी, आ. तारकाताईजी आ. संग्राम दादा, आ. उरकुडे सर जी, आ. अशोक दादा, सर्वांचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार. तसेच माझ्यावर अभिनंदनीय शुभेच्छांचा वर्षाव करून मला प्रोत्साहित केल्याबद्दल सर्व समूह सहकारी बंधू भगिनींचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार..
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



