
0
5
9
6
9
7
भाऊ
माझ्या यशावर हसणारा
स्वतःपेक्षा जास्त काळजी करणारा
संकटात धावून येणारा
तो म्हणजे माझा भाऊ
माझ्या दुःखात रडणारा
गर्दीतही आपला भासणारा
कधी गोड तर कधी कडू
तो म्हणजे माझा भाऊ
माझ्या शब्दात न मावणारा
दुःखात हसवणारा
कधि राग तर कधि प्रेमाची थाप
तो म्हणजे माझा भाऊ
माझ्या आधाराची सावली
दुःखात माझी माऊली
आई-वडिलांनंतर माहेर जपणारा
तो म्हणजे माझा भाऊ
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि.नागपूर
0
5
9
6
9
7



