Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडमराठवाडासाहित्यगंध

झंझावात

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 9 3

झंझावात

वाजला बिगूल निवडणुकीचा
होईल सुरू प्रचाराचा झंझावात
निष्ठावंताच्या कोलांट्याउड्यासवे
पडेल फसव्या घोषणांची बरसात

एकला चलो की युती आघाडी
धूसर वातावरण संभ्रमाचे
मीच आहे जागेचा दावेदार
लागतील डोहाळे उमेदवारीचे

सुखदुःखात न दिसणारे कधीही
बारसे तेराव्याला हजेरी लावतील
सोयरसुतक ना याना कशाचे
साळसूदपणाचा आव आणतील

देता हाक जो धावतच येईल
त्याच्याशी आपण बांधिल राहुया
सूज्ञ मतदार या लोकशाहीचे
सजग होऊनी मतदान करुया

आणेल जो विकासाचा झंझावात
निरखून पारखून त्यास देऊ समर्थन
घराणेशाहीची मोडून मक्तेदारी
सर्वसामान्यासाठी करु परिवर्तन

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे