Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

वाचू आनंदे

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 3 0 0

वाचू आनंदे

अभिमान अभिजात
वाचू आनंदे मराठी
लिहू, बोलू मराठीत
जपू अस्मिता मराठी.. //

जन्म भूमी. महाराष्ट्र
जन्म भाषाही मराठी
वाटे अमृताची गोडी
धन्य आमुची मराठी… //

हिच्या उदरी जन्मलो
ममतेने पाजी पान्हा
अ आ इ ई बाराखडी
ज्ञानवंत झालो तान्हा.. //

शिकू पुढे कैक भाषा
तुटू नये मातृ नाळ
सांगू गर्जून जगाला
मीच मराठीचा बाळ.. //

करू एकचि संकल्प
आधी मराठी गिरवू
भोई होवू पालखीचे
स्कंधी मराठी मिरवू.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे