Breaking
ई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरीत शेतकऱ्याचा सन्मान

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरीत शेतकऱ्याचा सन्मान

नवसुभाऊ गवते यांना मनोभावे शुभेच्छा

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

हिंगणा/ वानाडोंगरी : दि २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन या पवित्र दिनानिमित्त वानाडोंगरी येथील माजी उपसरपंच तसेच आमगाव, देवळी, वायफड परिसरातील प्रगतिशील शेतकरी मा. श्री. नवसुभाऊ हवसुजी गवते यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. हिंगणा शहर येथील राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. गजानन ढाकुलकर यांनी गवते यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.

यावेळी प्रतिक्रिया देताना नवसुभाऊ गवते म्हणाले की, “मी एक प्रगतिशील शेतकरी असून, मला राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शुभेच्छा देणारे ढकुलकरजी आपण पहिले मान्यवर आहात.” या शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त करत गदगद होऊन श्री. ढाकुलकर यांचे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना गजानन ढाकुलकर यांनी शेतकऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकत सांगितले की, “शेतकऱ्याला ‘जगाचा पोशिंदा’ असे म्हटले जाते. शेतकरी नसेल तर मानवी अस्तित्वालाच अर्थ उरणार नाही. शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यामुळेच सर्वसामान्यांच्या ताटात अन्न येते, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.” ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे कैवारी स्व. चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सन २००१ मध्ये त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

भारत हा कृषिप्रधान देश असून, आजही देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला अन्न मिळते. शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी स्व. चौधरी चरणसिंग यांनी विशेष प्रयत्न केले. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना जवळून माहीत होत्या.

“आज आपण सुखाचे दोन घास खात आहोत, ते केवळ शेतकऱ्यांच्या घामामुळेच. त्यामुळे शेतकऱ्यांचा आदर करणे, त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे आणि शेतीबाबत जनजागृती निर्माण करणे, हाच राष्ट्रीय शेतकरी दिनाचा खरा उद्देश आहे,” असे प्रतिपादनही ढाकुलकर यांनी केले. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त वानाडोंगरी परिसरात झालेला हा सन्मान शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला बळ देणारा ठरला असून, समाजाने शेतकऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवावी, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे