कवितानागपूरनाशिकपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
तुझ्या न येण्याने
काशीनाथ पैठणकर नगरसोल, जि.नाशिक

0
6
2
9
9
2
तुझ्या न येण्याने
कुठंच दिसत नाही
झाडाला हिरवी पानं
खपाटीला गेलं खोंड
चाटून कोरडं रान……१
रानभर पांगलं
कुसाळाच गवत
तुझ्या न येण्यानं
आली दुष्काळाची वरात…२
चीन चीन दुपारी
होते काहिली मनाची
डोळ्यादेखत झाली
होळी शिवाराची….३
तुझी वाट पहाता
नजर थकली,
व्यथेचा पाचोळा
भोवताली…..४
तुझ्या न येण्यानं
जीव वेडावतो,
साळुंखीच्या मनात
उभा देह शहारतो….५
काशीनाथ पैठणकर
नगरसोल, जि.नाशिक
========
0
6
2
9
9
2



