0
4
8
2
9
0
माझी पाककला ‘विधारा थालीपीठ’
साहित्य: २ वाट्या कणिक, १वाटी ज्वारीचे पीठ,१वाटी चना डाळीचे पीठ,२ टोमॕटो, २कांदे, हिरवी मिरची व लसूणपेस्ट दोन चमचे,ध नेजि-याची पूड, एक चमचा, हळद, मीठ, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, विधाराची पाने पाच ते सहा, लावण्यासाठी तेल इत्यादी
कृती: सर्व पीठ परातीत घ्या.टोमॅटो व कांदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.पाने चिरून घ्या.वरील सर्व जिन्नस घालून गोळा भिजवा. पोळपाटावर कपडा ठेवा त्यावर पाणी शिंपडा हाताने थालीपीठ थापा. त्याला छिद्रे पाडा. तव्यावर तेल लावून खमंग भाजून व दह्याच्या चटणीसोबत खायला द्या गरमागरम विचारा थालीपीठ.
टीप: याची सुकी भाजी करून खाऊ शकतो. बेसन लावून वड्या करता येतील.
वाढप: ही रेसीपी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



