‘मा.पद्माकर वाघरूळकर सर’ श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त
पद्माकर वाघरूळकर
‘मा.पद्माकर वाघरूळकर सर’ श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त
पद्माकर वाघरूळकर
ईश्वर कसबे, छ. संभाजीनगरबिनधास्त न्यूज नेटवर्क
बालानगर, (दि. ३० सप्टेंबर): मराठवाडा विभागातील पैठण तालुक्यात असलेल्या श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर येथील ज्येष्ठ भाषा-इतिहास शिक्षक, साहित्यिक व पत्रकार पद्माकर दत्तात्रय वाघरूळकर हे आपल्या नियत वयोमानानुसार २८वर्षे १ महिन्याची गौरवशाली शैक्षणिक सेवा पूर्तता करून सेवानिवृत्त झाले.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, शालेय समिती सदस्य भास्कर गोर्डे, पालक संघाचे अध्यक्ष राधाकृष्ण लिपाणे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजनानंतर पद्माकर व सौ. मीरा वाघरूळकर यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सरस्वतीची प्रतिमा व जोडआहेर देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सुदाम चिंचाणे, उपमुख्याध्यापक अविनाश खैरे, महेश सोमाणी, भास्कर गोर्डे, माजी पर्यवेक्षक लक्ष्मण महाजन, तुषार अहिरे, ज्येष्ठ बंधू शरद वाघरूळकर यांनी पद्माकर वाघरूळकर यांच्या सेवाकार्याच्या गौरवपर मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना, पद्माकर वाघरूळकर यांनी श्री सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेतील आपल्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल संस्थेचे ऋण व्यक्त केले तसेच २८ वर्षांच्या सेवेपैकी २५ वर्षे बालानगरमध्ये निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल बालानगर व पंचक्रोशीतील सर्वच गावातील नागरिकांचे मनापासून आभार मानले तसेच प्रशालेच्या भौतिक सुविधांसाठी दहा हजार रूपयांची सप्रेम भेट मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर सहकारी व बालानगर पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर येवतीकर, आभारप्रदर्शन व उत्कृष्ट फलकलेखन फेरोज पटेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनीच सहकार्य केले. तसेच पद्माकर सरांना पुढील भविष्यमय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.



