आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरभंडाराविदर्भ
जि.प. शाळा भोजापूरच्या चिमुकल्यांनी फुलवली परसबाग
वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत मुले घेतात परसाबागेची निगा
0
4
8
2
8
4
जि.प. शाळा भोजापूरच्या चिमुकल्यांनी फुलवली परसबाग
वृक्ष संवर्धन उपक्रमांतर्गत मुले राखतात परसाबागेची निगा
बातमीदार भोजापूर, पवनी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पवनी/ भोजापूर (दि. १२): जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोजापूर ता.पवनी, जि. भंडारा येथील वर्ग १ ते ३ च्या चिमुकल्यांनी परिश्रम करित वृक्ष संवर्धन या उपक्रमांतर्गत मेथी, पालक, फुलकोबी, कोथींबीर याचे वाफे तयार करून परसबागेत भाजीपाला उगवला. परसबागेतील कोबी, मेथी , पालक याचा वापर शालेय पोषण आहारात करण्यात येतो. भोजापूर परिसरात या उपक्रमाचे व मुलांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रवीण पडवाल सर व राहुल पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
0
4
8
2
8
4



