
0
6
1
1
8
5
गुरू दीपस्तंभ
ज्याच्या सहवासात होतो
ज्ञानार्जनाचा खरा शुभारंभ
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा
तो एकचि गुरू दीपस्तंभ
अथांग विद्येचा महासागर
नेई असाक्षर पैलतीर पार
अखंड माहितीचा स्रोत
त्याचे अगणित उपकार
सेवाव्रती राहून सदाच
राष्ट्रउभारणीस हातभार
अद्वितीय कार्य त्याचे
किती मानावे आभार
ज्ञानदीप लावून जीवनी
उजळतो शिष्याचे आयुष्य
मार्ग दाखवून सत्याचा
साकारतो तयाचे भविष्य
गुरुविण नाहीच उद्धार
तोच खरा आधारस्तंभ
नमन मनोभावे या गुरूला
तो एकचि दीपस्तंभ
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
6
1
1
8
5



