Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

अजाणता

मायादेवी गायकवाड मानवत परभणी

0 4 8 2 9 7

अजाणता

वय वार्धक्याकडे झुकले तरी
नाही,जात अजाणता मनातली,
दरी आपणच निर्माण केली
कुतूहल आणि प्रत्यक्षांतली.

अगंभुतच निवास तिचा
बालिशपणा ओळख तिची,
धरसोडपणा किती करावा?
नको,सवय मन मारून नेण्याची.

जपून ठेवू आनंद जीवनातला
खळाळता निर्जर ओढ्यातला,
अवर्णनीय अनुभव, बालपणातला
आणू उधाण सुखद आठवणीला.

जगणे असावे वाऱ्यासारखे
रोख टोख कधी नसावी,
ओसंडून वाहणाऱ्या आनंदास
तमा, वादळ वाऱ्याची नसावी.

अल्लड आणि चंचल मन
राहत नाही कधी काबूत,
स्वतःला तरुणच समजावे
तरच राहतील विचार शाबूत.

मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे