ई-पेपरकवितानांदेडसाहित्यगंध
नववर्ष
0
4
8
2
9
0
नववर्ष
सरून जाये जीवनी गत वर्ष
मनी दिसे नवर्षाचा हर्ष
गुंफल्या नव आठवणी पर्व
सखे संबंध देई इच्छित सर्व
नववर्षी आयुष्य दावी नवी दिशा
प्रपंचात मानसी राही नव आशा
दुःख विरूणी सुखी व्हावे सारे
हयातीचे हेची रहस्य खरे
सोसली पानगळ तरुतरुंनी
शिशीराने केली जरी दशा
वसंत आला निसर्ग फुलवित
चैत्रपालवीने नटली नवी उषा
नवं संकल्प वास्तवी आणू मनी
रोज स्वप्ने गुंफीत धाग्यांनी
गतानुभव जावे मनी विरूनी
चैत्रातील नववर्षाच्या आगमनी
जगदंबे विलास
गुजराती हायस्कूल,नांदेड
===========
0
4
8
2
9
0



