Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील कविता

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : त्या शीतलहरी????*
*????बुधवार : १८/ डिसेंबर /२०२५*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*’त्या’ शीतलहरी*

अपेक्षांची गर्दीही नको
फक्त मायेची हाक हवी
‘त्या’ शीतलहरी येताना
ऊब तुझ्या शब्दांची हवी
अवघडच ते सारे काही
शब्दही गोठून जाती कसे ?
आसवांच्या धारांनाही….
लपवती पहाटेचे दाट धुके
नाहीच रविकिरण जरी
पूर्वांचलीची लाली मिळू दे
रक्तवर्णी त्या रंगात रंगूनी
माझीच मला न्याहाळू दे
तू मी आणि इथे सारे काही
क्षणभराचे असती पाहुणे
मग का ‘त्या’ शीतलहरींनी
मन आपले गारठावे बरे…?

*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*’त्या’ शीतलहरी*

गारठला सारा निसर्ग
दवबिंदू पाना, फुलात
मोती जणू चमकणारे
हिरव्या त्या कुरणात

वाऱ्यासह वेगाने धावल्या
गार गार त्या शीतलहरी
निवारे शोधती सभोवती
उब घेण्या पाखरे बिचारी

आसमंती सर्वत्र ही धुकी
वाट चुकली पाखरांची
मिळेना कुठे त्यास सहारा
सैर थांबेना आकाशाची

दवात भिजता पिल्ली
उब देई माय पंखांची
किती थोर ही ममता
त्या मुख्या पाखरांची

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*

उघड्या नागड्या अंगांनी,
बळी राबतोय प्रहरी…
उन्हं वारा पाऊस आणि,
न छळे त्या शीतलहरी…१

कष्टकऱ्यांची जात निर्भय,
झेलती अंगावर काटा…
सुळ्यासारख्या जरी तिक्ष्ण,
असलेल्या चालती वाटा…२

थंडी असो गरमी असो,
शीवत नाही अंगालाही…
काळोखाची वाट चालून,
थिजून टाके रंगाला ही…३

शेती पिकास पोषकता,
गारवा देतसे सत्वरी…
*सुधाकरा* बळ देतसे,
वाहत्या *त्या शीतलहरी*…४

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*’त्या’ शितलहरी*

उबदार वसनात जरी
देह आज गुंडाळलेला
परी,’त्या’ शितलहरींचा
स्पर्श मनावर रेंगाळणारा

ना वसनाची जाण तया
ना आवरण कुठले देहाला
आदिवासी जमात जंगली
जगणे फक्त उदरभरणाला

येताच हिवाळी शितलहरी
मग शेकोटीचा असे सहारा
अवतीभवती शेकोटीच्या
नीज चक्षूतील देई पहारा

जेव्हा गाजवी अधिराज्य
निद्रादेवी त्या देहावर..
जळून होती,तन लाकडे
विव्हळणारे अश्रू अनावर

अशा वेळी चालत आली
तिथे एक प्रकाशवाट
कष्टप्रद अशा जगण्याला
लाभली माया ममतेची भेट

पशुतुल्य जीवन तयाचे
माणसात हो आज आले
मंदा नि प्रकाश आमटे
देवदूत हो तयाचे झाले

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*”त्या” शीतलहरी*

उणे शून्य अंशाच्या, तिथे “त्या” शीतलहरी
रक्त गोठवत असतील, कोणत्याही प्रहरी.. //

इथे आमच्या दिमतीला, उबदार मऊ गादी
तिथे तुझ्या पाठी पोटी, गार बर्फाची लादी.. //

इथे घेतोय आंम्ही सारे, सुखासीन सहारा
तिथे तू दिन रातभर, देतोय जागता पहारा.. //

तुझ्या मुळे उन्नत माथा, तिथे हिमालयाचा
आणि इथे सुरक्षित, हा कळस देवालयाचा..//

अशा प्रकोपी थंडीतही, डोळा तप्त अंगार
क्षणाक्षणाला वेध घेती, कुठे शत्रूचा एल्गार..//

हर रात्र असे वैर्‍याची, सावध नजर टकमक
ना जाणो कधी तिथे, झडेल घनघोर चकमक.//

परिस्थिती हाताळण्याची, ही अद्भूत हातोटी
भारतभूमीसाठी देतोस,तू जीवघेणी कसोटी..//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*’त्या’ शीतलहरी*

त्या शीतलहरी आताशा
झोंबती या तनामनाला
गारव्याचा होता स्पर्श
साहवेना या क्षणाला

किती शहारतो हा गारवा
चहूबाजू सर्व दशदिशांत
हवासा वाटला जरीही
होतो नकोसाच क्षणात

त्या शीतलहरींची किमया
गारठली झाडेझुडपे वेली
तापमान होऊ पाहे निचांकी
ऊबेशी लावते मग बोली

दिसती जागोजागी शेकोट्या
ऊबदार करण्यास काया
शीतलहरींवर तरळत जाते
वायू रथाची व्यथीत रया

लोकरीची ऊबदार माया
स्वेटर,मफलर,कानटोपी
मऊ बिछान्यावर आता
अंगावर घोंगडींची थप्पी

खानपानावरही होतोय कसा
शीतलहरींचा बेमालूम परिणाम
दैनंदिन कार्याचाही बदलला
एकूणच हा सारा आयाम

त्या शीतलहरींचा होतो
सकल परीसर गुलाम
नसे उपाय त्यापुढे काही
सारे शोधती आश्रय धाम

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*मु.पो.,रोहोकडी,*
*ता.जुन्नर, जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*

कडाक्याची थंडी वाढली
झोंबतोय अंगाला गारवा
हुडहुडी भरवतेय सर्वांगी
शेकोटीचा घेतात सुगावा

थंडगार होत असतं सारं
काकडून जाती हातपाय
भल्या पहाटे उठावं लागे
त्याशिवाय पर्यायचं नाय

पोटापाण्याचा प्रश्न आहे
ज्यांच पोट आहे हातावर
कितीही झोंबू देत गारवा
जावंचं लागतंय कामावर

त्या शीतलहरी हवेतल्या
स्पर्शून जाता तनमनाला
अंतरीच्या वेदना दडवून
ठेवावं लागतं भावनांना

अंथरुन पांघरून ना पूर्ण
पालावर संसार थाटलेला
ऊन वारा थंडी पावसांनी
जीवनप्रवास तो वेढलेला

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*

धारा वाहत असता घामाच्या
येतात क्वचित प्रातःकाळी
मनाला दिलासा गारव्याचा
खुलते हळूवार अधर पाकळी

विस्तवाला आवरत नाही
गारठा साऱ्यांस प्रथम प्रहरी
गोठवती जणू रक्त अंगीचे
बेदरकार त्या शीतलहरी

चीड असे का उष्मेची त्यांना
लगेच करती शीत जळाला
चुलीवरील तप्त अन्न ते
घटिकेतच का निवून गेला

ऊनी कपडे नसती तनूवर जर
दात खडखड किटकिट करती
थंडी दाखवी कमाल ऐसा
हिवाळ्यातच अधिक वृध्द गचकती

पांघरतो आम्ही ऊनी कांबळे
गरीबांच्या गोधडीने भागेल काय
दारं खिडक्या नसलेल्या घरात
झोप तयांना लागेल काय

*कु.संगिता रामटेके/भोवते*
*साकोली भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*”त्या”* *शीतलहरी*

थंडीचा तडाखा जेंव्हा
रक्त ही गोठवू लागतो…
उबदार पांघरुण घेण्यापूर्वी
बळीराजा आठवू लागतो..

नशीबी वीज कपातच ,तरी
वीजेची चिकाटीने वाट पाहतो.
पाणी फिरवायचे शेतात म्हणून
अर्ध्या रात्री ही अनवाणीच धावतो..

“त्या” शीतलहरी बळीराजाला
कधीच घाबरवू शकत नाही..
काळोख्या अंधाऱ्या,थंड रात्री
त्यांचे काम कधीच थांबत नाही..

आम्हीं घेतो मऊ,उबदार अंगभर
बळी शेतात राब राबतो..
शेत अन् पिकांना जणु तो राजा
मुलांसम मायाममतेने जपतो….

फक्त शेकोटीच्या जीवावर
करतो शेताची राखण..
त्या शीतलहरीचा मुकाबला
करतो हिमतीने प्रत्येक क्षण..

खडकाळ जमीनला ही करतो
सुजलाम सुफलाम सर्वदा…
अशा माझ्या बळीराजाला
लाभू दे देवा सुख संपदा…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*’त्या ‘ शीतलहरी*

फाटकी तुटकी झोपडी
अन् त्यात संसाराची गर्दी
सदा न् कदा लागलेली
गरिबीची ती वर्दी ॥

दारासमोरच्या मोरीवर
टाकलेला फरशीचा तुकडा
सुरकुतलेल्या देहाचा
रोज दिसायचा मुखडा ॥

असो ऋतू कोणताही
शय्या तिची तिथेच
पोटामध्ये नाचायची
भूकेची ती भूतेच ॥

केविलवाणी स्थिती पाहून
पाझर फुटला मनाला
खायला द्यावे पोटाला
पांघरून घालावे तनाला ॥

पहाटेचे ते दृश्य पाहून
धारा लागल्या डोळ्याला
रात्रीच्या ‘त्या ‘शीतलहरी
कायम निजवून गेल्या तिला ॥

तेव्हापासून आजपावेतो
ते पांघरून घेऊन फिरत आहे
उघडे देह पांघरतांना
नजर तिला शोधत आहे ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे