स.प.महाविद्यालयात युद्ध विजय दिवस साजरा
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
स.प.महाविद्यालयात युद्ध विजय दिवस साजरा
उत्कृष्ट छात्र सैनिक पुरस्कार प्रदान
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे दि.17डिसे.(प्रतिनिधी) सर परशुरामभाऊ महाविद्यालय,अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि राष्ट्रीय छात्रसेना व सशस्त्र सेना यांनी संयुक्तपणे १९७१ च्या भारत – पाकिस्तान युद्धातीव विजयाची स्मृती म्हणून “विजयदिन” साजरा केला. यावेळी या युध्दात शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमात मेजर एच डी मांजरेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्कृष्ट एन.सी.सी. कॅडेट पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. एनसीसी कॅडेट्स शिवकुमार मोरे यांना प्रथम पुरस्कार, कॅप्टन राजशी सुंकले यांना, द्वितीय आणि अभिज्ञा दीक्षित यांना तृतीय पुरस्कार पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या विशेष प्रसंगी १९७१ च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले ब्रिगेडियर (नि)अजित आपटे, ब्रिगेडियर प्रकाश गोगले (नि) प्रा. डॉ. सुनील गायकवाड,एअर मार्शल प्रदीप बापट (नि) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ब्रिगेडियर अजित आपटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना १९७१च्या युद्धात स्वतः प्रत्यक्ष अनुभवलेल्या अतुलनीय शौर्याच्या आठवणी जागवल्या.
कार्यक्रमात एन सी सी कॅडेटस यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्र संचालन पार्थ केळकर व स्वराज वांडरे यांनी केले. कार्यक्रमास निवृत्त एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य,प्रणव देखणे,डॉ गोविंद धुळगंडे, लेफ्टनंट बी पी भाऊराळे, कर्नल नरेश गोयल (नि) व्हेटरियन्स अविनाश वझल, दिलीप दीक्षित, सुभेदार रामदास काशीद, मधुकर साकोरे, माणिक मुंढे, महावीर सौंदत्ते हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय, भारत-पाकीस्तान युध्दात सहभागी झालेले अनेक युध्दवीर खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाचे मेजर अब्बास आणि मेजर अमृता नायर तसेच, प्रणव देखणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते, अशी माहिती एअर मार्शल प्रदीप बापट (नि.) यांनी दिली.