“मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय शब्दसुमने”; विष्णू संकपाळ
परीक्षक सहप्रशासक

“मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभारीय शब्दसुमने”; विष्णू संकपाळ
अखंड सन्मानपत्र सप्ताह
भासते अभूतपूर्व नवलाई
मराठीचे शिलेदार समूहाचा
मी होवू तरी कसा उतराई…
दि. २/१२ ते १०/१२ अखेर
हरवलेल्या वाटा त्रिवेणी
भास आनंदाचा.. काव्यरत्न
हायकू काव्य सर्वोत्कृष्ट
सुखाच्या वाटा.. काव्यस्तंभ
धुंदीत गाऊ सर्वोत्कृष्ट पोष्टर
अशी सातत्यपूर्ण सन्मानाची मेजवानी प्राप्त झाली. हा आठवडा जणू काही लाॅटरीच लागली की काय? असे जाणवले. आज सकाळी आ. राहुल दादां चा ‘तुमचा फोटो पाठवा’ हा जादूई मेसेज पाहिला आणि ‘धुंदीत गाऊ’ याच रचनेची खात्री थोड्याच वेळात पटली. सर्व विषय खरेच खूप उत्तम होते. वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यासाठी पुष्कळ वाव होता. शिवाय कल्पना आणि वैचारिकतेचा कस लावणारे होते. अर्थात गेल्या चार वर्षांपासून असे आव्हानात्मक विषय खूप हाताळले आणि अगणित सन्मानपत्रांचा एक गठ्ठाच तयार झाला असेल.
आदरणीय राहुल दादा. आणि टिम जे काही विषय देतात त्यामागे एक निश्चित हेतू असतो. तो समजून घेऊन लेखन व्हावे ही एक सुप्त अपेक्षा असते. कारण हा समूह केवळ टाइमपास नसून मराठी भाषा सक्षमीकरण करता करताच, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, कृषी, परंपरा, संस्कृती, शिक्षण अशा सर्व विषयावर मार्मिक भाष्य आणि प्रबोधनात्मक, वास्तववादी दर्जेदार लेखन व्हावे. ही धारणा असते.
किंबहुना ज्यामुळे मराठी साहित्य विश्वात कसदार लेखन करणारे कवी कवयित्री निर्माण व्हावेत. हाच या समूहाचा उदात्त हेतू आहे. स्वतः आ. राहुल दादांची प्रेरणा, मेहनत, आ. पल्लवीताईजींचे सहकार्य, जोडीला आ. वैशालीताईसाहेब, आ. सविताताईजी, आ. स्वातीताईंजी. आ. वृंदाताईजी यांची दर्जेदार परिक्षणे. ज्यातून काव्यलेखन कौशल्याचे विशेष धडे मिळतात. शिवाय आ. संग्राम दादा, आ. लांडगे दादा, आ. उरकुडे सर, आ. तारकाताईजी, सुधाताई, शर्मिलाताई, विकास सर. या सर्व प्रशासक सहप्रशासकाचे बहुमूल्य सहकार्य
या सर्व गोष्टी या कार्यात महत्वाच्या आहेत. दादांच्या प्रयत्नातून आजवर शेकडो काव्यसंग्रह प्रकाशित झाले. शिवाय या समूहाच्या माध्यमातून साहित्याची अनेक दालने खुली करण्यात आली. की जेथे संपूर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्री स्वतःला अजमावता आहेत.
गेली चार वर्षाहून जास्त काळ मी या समूहाशी जोडलो.. आणि घडलो सुद्धा. मात्र अजूनही खूप काही शिकण्याचे बाकी असल्याचे जाणवते ज्याचा निरंतर शोध चालूच आहे. अस्सल कविता जन्माला घालायची आहे.!! हा समूह एक विद्यापीठ असून मला त्यातला एक विद्यार्थी होता आले याचा अभिमान वाटतो. सन्मान तर मिळत राहतातच. मात्र मराठी भाषेसाठी एक खारीचा वाटा उचलता येतोय. याहून मोठा सन्मान नाही.
आज ‘धूंदीत गाऊ’ या सर्वोत्कृष्ट पोष्टरसाठी आ. राहुल दादां आणि संपूर्ण प्रशासकीय टिमचा मी आजन्म ऋणी आहे. त्याचप्रमाणे सर्व समूह सहकारी ज्यांच्या प्रेरणेशिवाय, हा प्रवास अधूरा आहे अशा समूहातील समस्त सारस्वतांचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार. वैयक्तिक नामोल्लेख टाळून इथेच रजा घेतो.
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य, सहप्रशासक, परीक्षक मराठीचे शिलेदार समूह





