Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरसांगलीसाहित्यगंध

समजून घेताना

वृंदा(चित्रा)करमरकर सांगली

0 5 6 8 0 0

समजून घेताना

मी कुठे कमी पडलो
समजून घेताना तुला
गोफ प्रेमाचा उसवला
तुझ्या माझ्यात गुंफलेला

जे आवडत होते तुला
ते का नकोसे जाहले
शब्द तुला भावलेले
आज जहर का भासले?

काल जी गंधित फुले
तुझ्या केसात माळली
आज का निर्माल्य झाले
उडून गेले ते वावटळी

घेतल्या ओलेत्या शपथा
आज अर्थ त्याचा लोपला
प्रेमापेक्षा गर्वताठा मोठा
होऊनी मार्ग होई वेगळा

जीवनी का असेच होते
आपुलकी संपते क्षणात
नात्यात पसरती काटे
दुराव्याची उभी भिंत

वृंदा(चित्रा)करमरकर सांगली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे