Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

‘मराठी भाषा संवर्धनाचा महायज्ञ’; डॉ पद्मा जाधव वाखुरे

डॉ. पद्मा वाखुरे-जाधव, छत्रपती संभाजीनगर

0 4 8 2 9 7

मराठी भाषा संवर्धनाचा महायज्ञ’; डॉ पद्मा जाधव वाखुरे

“मराठी माझी मायबोली
घडविले तिने व्यक्तिमत्त्व,
मराठी माझी जीवनशैली
जगण्या मिळते जीवनसत्त्व”

अशी आपल्या मराठीची थोरवी. तिचे गुणगान गाण्या शब्द पडतात थिटे. या ‘मराठी भाषा’ संवर्धनाच्या महायज्ञात मोलाचे योगदान देणारा आपला ‘मराठीचे शिलेदार’ समूह. या समूहाचे आपण सदस्य आहोत याचा सार्थ अभिमान आहे.

दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत शासन परिपत्रकानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा होत आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पंधरवडा संपेल, अहवाल सादर केले जातील. पुढे काय ?

आपल्या समूहात ना कोणतं परिपत्रक, ना कोणता शासन आदेश, पण तरीही नित्यनेमाने इथला नियमित कार्यक्रम अगदी वक्तशीरपणे सुरू असतो. नवनवीन काव्यप्रकार, विविध स्पर्धा, प्रशस्तीपत्रांची रेलचेल, सामान्यज्ञान, बोधकथा, शब्दकोडी अशा विविध उपक्रमांना तोड नाही. सर्व समूहामध्ये कल्पनांचा सुकाळ, रचनांची रेलचेल, कौतुकाला तर इथं सीमाच नाही. अभिनंदनाचा वर्षाव करण्या सारेच तत्पर. आपण सर्वजण हे सर्व फक्त आणि फक्त इथेच अनुभवू शकतो. आपण सारे या समूहात मराठी भाषेच्या प्रेमापोटी जोडले गेलोय याचा खरंच खूप अभिमान आहे, आनंद आहे.

मी सहजच “पुन्हा फुलेन मी” ही रचना समूहात सादर केली नी आदरणीय राहुल दादांचा संदेश आला ‘तुमचा फोटो पाठवा’. मनस्वी आनंद तर झालाच, पण आपण समूहाप्रति किती उदासीन झालोत याची खंतही वाटून गेली.

कार्यबहुल्यामुळे समूहात सक्रिय राहता येत नाही हे शल्य सतत आहेच. दर्जेदार रचना, अभ्यासपूर्ण परीक्षणे यांना दाद देऊ शकत नाही याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते.

आदरणीय राहुल दादा आणि सौ.पल्लवीताई यांचं मराठी भाषा संवर्धनासाठीच्या या महायज्ञातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या या मायबोलीच्या सेवाकार्याला त्रिवार वंदन करते. समूहासाठी कर्तव्यतत्पर असलेली प्रशासक, सहप्रशासक मंडळी आपली सर्व वैयक्तिक कामं सांभाळून समूहाची सोपविलेली जबाबदारी स्वेच्छेने आणि तेवढ्याच कर्तव्यनिष्ठेने पार पाडतात. आदरणीय वैशालीताई, सविता, वृंदाताई, तारकाताई, शर्मिलाताई, आदरणीय विष्णू दादा, ज्यांनी मला या समूहाचा भाग बनवलं ते संग्रामदादा आणि ज्यांच्या रचनांच्या वर्षावाने समूह सतत सक्रिय असतो असे सर्व ताई दादा. मी कधीतरीच समूहात डोकावते पण माझ्याप्रति सर्वांचं प्रेम आणि आपुलकी तेवढीच प्रबळ असल्याचं जाणवतं. खूप भारावून गेल्यासारखं वाटतं. आपल्या सर्वांच्या मी ऋणात राहू इच्छिते.

डॉ. पद्मा वाखुरे-जाधव, छत्रपती संभाजीनगर
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे